नाशिक

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर?

CD
ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर? --- दुष्काळाचा परिणाम : इच्छुकांची धाकधूक वाढली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : दुष्काळाने अवघा जिल्हा होरपळला असून, अपुऱ्या पावसाअभावी खरीप हंगाम करपला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्रावर परिणाम झाला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांनाही दुष्काळाची झळ बसू शकते. दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची भीती असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात यंदा ३० टक्के पर्जन्यतूट नोंदविण्यात आली. पंधरापैकी तब्बल दहा तालुक्यांत अपुऱ्या पावसाअभावी राज्य सरकारने दुष्काळ घोषित केला आहे. या सर्व तालुक्यांत ट्रिगर-१ लागू करताना दुष्काळी उपाययोजना राबविण्यावर भर दिला जातोय. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था होरपळून निघत आहे. परिणामी, गावपातळीवर स्थिती अधिक भयावह होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, या दुष्काळाचा फटका आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनाही बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अंदाजे ६२१ ग्रामपंचायतींमध्ये पंचवार्षिक मुदत संपुष्टात येण्यासह काही गावांत नव्याने ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या आहेत. सध्याच्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामुळे या सर्व गावांमध्ये प्रशासकराज असून, साधारणत: दिवाळीनंतर निवडणुकांचा बार उडेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, जिल्ह्यात सध्या दुष्काळाने डोके वर काढले आहे. या परिस्थितीत धरणांमधील साठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला. त्यामुळे खरिपाबरोबरच येत्या काळातील रब्बी हंगाम धोक्यात येईल. अशा परिस्थितीत सरकार दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांवर भर देत आहे. दुष्काळाचे एकूणच संकट विचारात घेत ग्रामपंंचायतींच्या निवडणुकांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. गावपातळीवर नियोजन दुष्काळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी गावपातळीवर आता सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्यात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची उपलब्धता करून दिली जाईल. तसेच, ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेतून ग्रामीण मजुरांच्या हातांना रोजगार देण्यासह निरनिराळ्या उपाययोजनांवर प्रशासनातर्फे भर दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT