ZP School of Badapur & Ramnath Devde esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : बदापूरचे ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे लाच घेताना ACBच्या जाळ्यात!

बदापूरचे ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे यांना कामात अडथळा न आणण्याच्या बदल्यात लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : शासकीय कामात टक्केवारी हा प्रकार नवीन नाही.आता तर ग्रामपंचायतीमध्ये देखील याचे पेव फुटल्याच्या चर्चा सुरू आहे.

याचा प्रत्यय आला असून बदापूरचे ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे यांना कामात अडथळा न आणण्याच्या बदल्यात लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. (Gram Panchayat member of Badapur Ramnath Devde arrested by ACB taking bribe Nashik Crime)

जिल्हा परिषदेच्या बदापूर शाळेला प्रधानमंत्री श्री निधीतुन ७.३० लक्ष रुपये मंजूर झाले असून सदर निधीतून शाळेत सुशोभीकरण व परसबागचे काम सूरु आहे.

याबाबत चिंचोडी खु. व बदापूर ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य असलेल्या रामनाथ उमाजी देवडे (वय- ५२ वर्षे) यांनी ग्रामपंचायत सदस्या या नात्याने ग्रामपंचयातच्या माध्यमातुन कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात यासंदर्भात जिल्हा परिषद शाळेचे शालेय समिती अध्यक्षाकडे दि. १४ फेब्रुवारी रोजी २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची रक्कम घेण्याचे ठरले.

सदरची रक्कम स्वीकारतांना देवडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील हावलदार सचिन गोसावी, अविनाश पवार यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT