Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: तळेगावच्या ग्रामसेवकाने घेतली 25 हजारांची लाच! ‘लाचलुचपत’कडून अटक

त्र्यंबकेश्‍वर नजिकच्या तळेगाव अंजनेरी येथील स्मशानभूमीच्या कामाचे बिलाचे अनुदान मंजुरीसाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर नजिकच्या तळेगाव अंजनेरी येथील स्मशानभूमीच्या कामाचे बिलाचे अनुदान मंजुरीसाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली. याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (gram sevak of Talegaon took bribe of 25 thousand Arrested by ACB case filed at trimbakeshwar police Nashik Crime)

ज्ञानेश्वर शांताराम शिंपी (42, ग्रामसेवक, सजा तळेगांव (अं), ता. नाशिक) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या मुलास तळेगाव (अं) येथील स्मशानभूमीच्या कामासाठी 9 लाख 96 हजार 538 रुपये तळेगांव (अं) ग्रामपंचायतीकडून मिळाले होते.

त्यापैकी शासकीय शुल्क कापून 7 लाख 47 हजार 700 रुपये तक्रारदाराच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्यासाठी लाचखोर ग्रामसेवक शिंपी याने शुक्रवारी (ता.९) तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामपंचायत परिसरात सापळा रचला असता, लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली.

त्यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर ग्रामसेवकास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagavi Water Crisis : पाणीटंचाईचं संकट! महाराष्ट्राकडून कर्नाटकला मिळणार का 2 TMC पाणी? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

US Iran Peace Deal : मध्यपूर्वेत शांततेची नवी पहाट ! अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; युद्धाला पूर्णविराम, 'होर्मुझ' खुली होणार

Operation Tiger: एकनाथ शिंदेंचा प्लॅन बिघडला? दोन खासदारांच्या भूमिकेमुळे 'ऑपरेशन टायगर' अडचणीत, सस्पेन्स कायम!

Maharashtra Protest Cases: आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा! आंदोलनांदरम्यान दाखल ४४ खटले रद्द होण्याच्या मार्गावर, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

Monsoon Update Maharashtra: मान्सून जैसे थे! पावसाची दडी, राज्यात उकाडा कायम राहणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT