Bribe crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : दिंडोरी तालुक्यातील ग्रामसेवक ACBच्या जाळयात!

दिगंबर पाटाेळे

नाशिक : रामशेज आशेवाडी, ता. दिंडोरी येथील ग्रामसेवकाला पिंपळनारे, ता. दिंडोरी येथे मृत्यूच्या दाखल्यासाठी सहाशे रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले असून सदर ग्रामसेवक रात्री उशिरापर्यत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते. (Gramsevak of Dindori taluka arrested by Anti corruption bureau Nashik Bribe Crime)

आशेवाडी येथील एका नागरिकाच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले होते त्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी तक्रारदाराकडे ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे( वय 52) रा नाशिक यांनी सहाशे रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून मृत्यू प्रमाणपत्रासाठी सहाशे रुपये घेताना अतिरिक्त ग्रामपंचायतचा कार्यभार असणाऱ्या ग्रामपंचायत पिंपळनारे येथे रंगेहात पकडले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांच्या नेतृत्वाखालील प्रवीण महाजन अजय गरुड परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली याबाबत त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या घटनेने दिंडोरी पंचायत समिती मध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Rule: शाळेच्या ५० मीटरच्या आत जंक फूडला बंदी; FSSAI परवाना सक्तीचा, महाराष्ट्रात शाळा, वसतिगृह, कँटीनसाठी नवे नियम

Achalbet Guru Pournima: अचलबेट तीर्थक्षेत्रात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य गोल रिंगण; पाच पालख्यांच्या संगमाने तुकाई परिसर दुमदुमला

Pune Civic Tender Row: पुणे महापालिकेच्या झाडणकाम निविदेवर अडीच तास खडाजंगी; नगरसेवकांच्या प्रश्नांवर ‘झाडू’, नाराज सदस्यांचा सभात्याग

Live Marathi News Update : अज्ञात व्यक्तींच्या गटासोबत झालेल्या वादातून ३० वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या

Khutbav Robbery Plot Foiled: खुटबावमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या सापळ्यात; पाच जेरबंद

SCROLL FOR NEXT