शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांना
गोदातीरी महाआरतीचे निमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : ३१ ऑक्टोबरला नाशिकच्या गोदातीरी आयोजित केलेल्या महाआरतीसाठी शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांना आमंत्रित केले आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.४) भेट घेऊन निमंत्रण दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात साडेसहा हजार आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत महाआरती केली जाणार असल्याचे संस्थेने कळविले आहे.
३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सायंकाळी गोदातीरी ही विशेष महाआरती होणार आहे. यामध्ये साडेसहा हजार आदिवासी बंधू-भगिनी सहभागी होतील. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हा उपक्रमामागील उद्देश असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. उपक्रमामागील व्यापक सामाजिक उद्देश जाणून घेतल्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजींनी या उपक्रमाचे स्वागत केले असल्याचे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने कळविले आहे. या प्रसंगी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, उपाध्यक्ष नरसिंह कृपादास, पंडित शांताराम भानोसे, शैलेश देवी, शिवाजी बोंदारडे, प्रफुल्ल संचेती, विनीत पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.