night views village 1.jpg
night views village 1.jpg 
नाशिक

थरारक! रात्रीची वेळ..आजी अन् नात बसल्या घराबाहेर हवा खात...तेवढ्यात मागून...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / देवळाली कॅम्प : वेळ रात्री दहा वाजेची.. जेवण आटोपून कासार कुटुंबातील आजीबाई आपल्या चार वर्षीय नातीसोबत बाहेर हवेशीर ओट्यावर बसलेल्या....नाती ओट्यावर खेळण्यात दंग असताना अचानकपणे असे काही घडले अन् सर्वांना धक्काच बसला.

असा घडला प्रकार

शेवगेदारणा-पळसे शिवारात कासार वस्तीत घराच्या ओट्यावर गजराबाई कासार पाचवर्षीय नात समृद्धी अंकुश कासार हिला खेळवत असताना, शेजारच्या उसाच्या शेतातून बिबट्याने अचानक समृद्धीवर हल्ला चढवला. अन् तिच्या जोरजाराने रडण्याच्या आवाजाने आजीबाई तत्काळ सावध होत क्षणाचाही विलंब न करता बिबट्या ओट्यावरून खाली जाता नाही तोच त्याच्यावर झडप घेतली. त्याला हाताच्या बुक्क्यांनी मारत जबड्यातून आपल्या नातीची सुटका करण्यामध्ये यशस्वी होतात.अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना नाशिकमधील गोदाकाठालगत असलेल्या पळसे शिवारातील अंकुश कासार यांच्या गट क्रमांक ३१७मधील ऊसशेतीत घडली. आजी व नातीचे दैव बलवत्तर असल्यामुळे दोघीही बिबट या हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यातून  बचावल्या. चार वर्षीय समृध्दीच्या डोक्याला काही प्रमाणात जखमा झाल्या असून तिला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आहे. समृध्दी आता सुखरूप असून डॉक्टरांनी तिला घरीदेखील सोडले असल्याची माहिती वनविभागाने दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व वनरक्षकांची टीम दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील तसेच नाशिक पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे हे आपल्या पथकासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी कासार कुटुंबियांची भेट घेत समृध्दीच्या जखमांची पाहणी करून पंचनामा केला. तसेच वनरक्षकांच्या टीमने हातात टॉर्च घेत संपुर्ण शेतीचा परिसर पिंजून काढत बिबट्या जवळपास कोठे दडून बसलेला नाही, याची खात्री पटविली. बिबट हल्ला टाळण्यासाठी या भागात जनजागृतीपर ध्वनिफित वाहनाच्या भोंग्याद्वारे वाजवून लोकांना पुन्हा सावध करण्यात आले. तसेच कासार कुटुंबियांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना सुचविल्या.रात्रीच्या वेळी आपल्या घराजवळ जास्त प्रमाणात प्रकाश राहील अशी विद्युत व्यवस्था करावी. शेकोटी बांधाजवळ पेटवून ठेवावी आणि अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे. ऊसशेतीचे बांध व घराचा ओटा यामध्ये अंतर असले पाहिजे. तसेच चेनलिंक फेन्सिंगचे कुंपण तरी बांधावर किमान घराच्या समोर तर केलेले असावे.

परिसरात भीतीचे वातावरण

त्यावेळी गजराबाईंनी मोठ्या धैर्याने बिबट्याच्या तावडीतून समृद्धीची सुटका केली व बिबट्याला पळवून लावले. या हल्ल्यात समृद्धी जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे मळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने तत्परतेने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

शेतमजूरांनी काळजी घेणे आवश्यक

एकलहरे, पळसे, हिंगणवेढे या गोदावरी, दारणा नदीच्या खोऱ्यात ऊसशेती भरपूर प्रमाणात केली जाते. यामुळे या भागात दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढताना दिसत असल्याचे भदाणे यांनी सांगितले. सामनगाव बीटमधील सुमारे २० ते २५ गावांमध्ये बिबट संचार असून या सर्वच गावांमध्ये वनविभागाकडून पिंजरे तैनात करण्यात आले आहेत; मात्र शेतकऱ्यांनी व शेतीवर राहणाऱ्या शेतमजूरांनी आपली व कुटुंबियांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT