NMC Nashik News
NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Market Fee : बाजार फी वसुलीला महासभेची Green Light!

सकाळ वृत्तसेवा

NMC Market Fee : करोडो रुपये अपेक्षित असताना लाखांच्या आत रखडलेली बाजार फी वसुल करण्यासाठी बाह्य एजन्सीची नियुक्ती करण्याला अखेर महासभेने हिरवा कंदील दाखविला आहे.

परंतु बाजार फी वसुलीचे खासगीकरण झाले असले तरी फेरीवाल्यांवर वचक असलेले भाई- दादा प्रशासनाचा हा प्रयोग कितपत यशस्वी होवू देता, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. (Green Light of Mahasabha to collect NMC Market Fee nashik news)

फेरीवाल्यांकडून महापालिकेकडून बाजार फी वसुल केली जाते. परंतु दहा हजारांपर्यंत फेरीवाले असताना लाखांच्या आत उत्पन्न कसे, असा सवाल अनेकांना पडतं होता. महापालिकेचे बाजार फी वसुल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पूर्ण क्षमेतेने वसुली होत नसल्याची बाब समोर आली होती.

त्यामुळे गळती शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २०१९ मध्ये ८७.४२ लाख रुपये, तर २०२० मध्ये जवळपास २२ लाख रुपये वसुल झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला. कोविडमुळे महापालिकेने वसुलीवर मर्यादा आणल्या.

एका फेरीवाल्याकडून सरासरी वीस रुपये बाजार फीनुसार एक लाख ९० हजार रुपये प्रतिदिन मिळणे अपेक्षित आहे. वाढत्या फेरीवाल्यांच्या संख्येनुसार जवळपास नऊ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न प्राप्त होणे अपेक्षित असताना तेथे लाखांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याने पाच वर्षासाठी कमिशन बेसवर फेरीवाल्यांकडून दैनंदिन शुल्क वसुलीचा ठेका देण्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

औद्योगिक वसाहतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीत रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अमृत- २ योजनेत प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. प्रकल्प तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

अमृत- २ योजना महापालिका क्षेत्रासाठीच लागू आहे. एमआयडीसीला अमृत योजनेतून निधी मिळत नसल्याने महापालिकेच्या माध्यमातून यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासनाला सादर केला जाणार आहे.

२०० कोटींचा प्रकल्प आहे. १.८ टक्के दरानुसार दोन कोटी १६ लाख रुपये सल्लागारासाठी खर्च केले जाणार आहे.

मनपा रुग्णालयात पॅरामेडिकल विद्यार्थी

पॅरामेडिकल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना अनुभवासाठी महापालिकेच्या रुग्णालयात प्रॅक्टीस करण्यास परवानगी देण्यात आली आहे. करन्सी नोट प्रेसला सामाजिक दायित्वाच्या निधीतून नाशिक रोडच्या स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रक्तघटक रक्तपेढीच्या उभारणीला परवानगी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT