बाइक रॅलीत सहभागी नाशिक रोडमधील महिला व मुली.
बाइक रॅलीत सहभागी नाशिक रोडमधील महिला व मुली. Sakal
नाशिक

नाशिक रोडला भीमकन्या बाइक रॅली काढून महामानवाला अभिवादन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड - महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड परिसरात भीमकन्या बाईक रॅली काढण्यात आली. सुमारे अडीचशे युवती एकत्रित येऊन त्यांनी महामानवास आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने संपूर्ण नाशिक रोड शहरात बाईक रॅलीच्या माध्यमातून अभिवादन केले.

डोक्यावर निळा फेटा आणि अंगावर पांढरे रंगाचे वस्त्र परिधान केले होते. नाशिक रोड परिसरात फेरी काढून बाबासाहेबांचा विजय असो, बोलो, बोलो जयभीम घोषणांनी वातावरण संपूर्ण निळेमय केले होते. बाईक रॅलीत साधारण अडीचशे युवतींनी सहभाग घेतला होता. रॅलीची सुरवात नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहार येथून सुरवात होऊन रमाबाई आंबेडकरनगर, विहीतगाव, बिटको पॉइंट, शिवाजीनगर, सैलानी बाबा, इंदिरा गांधी पुतळा, मंगलमूर्ती नगर, जेल रोड आदी भागातून ही रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये मानसी जाधव, प्रीतम साळवे, शिल्पा पंडित, स्वीटी भोळे, दिव्या भोळे, प्राजक्ता पंडित, तेजल आढाव, प्राजक्ता गांगुर्डे, माधुरी पंडित, प्रियांका टेपले, कीर्ती ब्राह्मणे, नीता सोनकांबळे आदी सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे यांच्या भेटीला शिवसेनेचे उमेदवार

SCROLL FOR NEXT