Guardian Minister Bhujbal advice to BJP nashik marathi news 
नाशिक

Gram Panchayat Result : राज्यातील नागरिकांनी महाविकास आघाडी स्वीकारली - छगन भुजबळ

विनोद बेदरकर

नाशिक : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मत पडली त्यामुळे आता भाजपने या निकालाचे आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ग्रामपंचायत निकालाचे आत्मचिंतन करावे; पालकमंत्री भुजबळांचा भाजपला सल्ला 

रस्ते सुरक्षा उध्दाटनाच्या निमित्ताने भुजबळ आले असतांना पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले की, राज्यभरातील गावात महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश म्हणजे राज्यातील नागरिकांनी महाविकास आघाडी स्विकारली.हेच निवडणूकीचे विश्लेषण आहे. भाजपच्या ने्त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतराच्या अनुषंगाने जास्त ताणले जाउ नये.बेळगावला मराठी भाषिकावर अन्याय सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असतांना कर्नाटक सरकारकडून सुरु असलेली गळचेपी अयोग्य आहे.

धनंजय मुंडे प्रकरणी भुजबळ म्हणाले....

धनंजय मुंडे यांची चौकशी सुुरु आहे. त्यांच्याशिवाय आणखी एक दोन तक्रारी आल्या आहेत. त्यामुऴे काही लोक नुसते ब्लॅकमेल करतात हेही पुढे येते आहे. त्यामुळे या सगळ्याची सविस्तर चौकशी सुरु आहे.

स्व नव्हे सामायिक बळाची भाषा
ग्रामपंचायत निवडणूकाप्रमाणे आगामी निवडणूकात हेच यश कायम ठेवण्यासाठी स्वबळाची नव्हे तर तीन्ही पक्षांना सामुहीक बळाची भाषा करावी लागणार आहे. सामुहीक बळाची भाषा केली तरच यापुढील निकाल महाविकास आघाडीसाठी चांगले राहतील. असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics: गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा घाट; ‘कोट्यवधींची आमिषं आली, पण...’, बड्या नेत्याचा मोठा दावा

Who Is Lhuan-dre Pretorius: गेलचा विक्रम मोडणारा हा २० वर्षांचा पठ्ठा आहे तरी कोण? ७९ चेंडूत १८८ धावा ठोकत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं

आजचे पंचांग 3 ऑक्टोबर 2026! जाणून घ्या राहुकाळ, शुभ मुहूर्त, कालाष्टमी

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

PM मोदींचा बारामती दौरा ठरला! शरद पवारांनी दिली मोठी माहिती; नेमकं काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT