Guardian Minister Bhujbal
Guardian Minister Bhujbal  Google
नाशिक

जिल्हा बँकेची सक्तीची वसुली थांबविण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून, सातत्याने होणारी गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यातच शेतमालाला भावही मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कोरोनामुळे अनेक शेतकरी कुटुंबीयांवर संकट कोसळल्याने बळिराजा अडचणीत सापडला आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकर्‍यांकडून वसुलीपोटी सुरू केलेली जप्तीची कारवाई अत्यंत चुकीची असल्याने ही सक्तीची वसुली तत्काळ थांबवून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण (deepika Chavan) यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे केली. (Guardian Minister Bhujbal has ordered to stop the compulsory recovery of District Bank)


या मागणीची दखल घेत पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना ही सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकर्‍यांकडून सक्तीच्या वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. मात्र बागलाण तालुक्यात सातत्याने होत असलेली गारपीट, अतिवृष्टी आणि भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच शेतमालाला भावही मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत बळिराजाला दिलासा देणे गरजेचे असताना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून थकबाकीदार शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर, जमीन आणि इतर साहित्याची जप्ती सुरू आहे. खरीप हंगामात शेतीची कामे करण्यात व्यस्त असलेल्या शेतकर्‍यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, ही वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी बागलाण तालुक्यातील शेतकर्‍यांनी माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्याकडे केली होती.


त्यानुसार माजी आमदार सौ.चव्हाण यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. भुजबळ यांनी तातडीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना ही सक्तीची वसुली थांबविण्याच्या सूचना दिल्या असून, जिल्हा बँकेला कोणत्याही परिस्थितीत वसुलीसाठी पोलिस बंदोबस्त देऊ नये, असे निर्देशही पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना दिले आहेत.

(Guardian Minister Bhujbal has ordered to stop the compulsory recovery of District Bank)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

"राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी फडणवीसच..." भाजप आमदार म्हणाला, मी तर ओपन बोलतो

Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

Viral Video: मानवी बोटानंतर आता महिलेला ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीमध्ये सापडली गोम

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

SCROLL FOR NEXT