Dada Bhuse news esakal
नाशिक

Dada Bhuse News: दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन : पालकमंत्री भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse News : दाभाडी (ता. मालेगाव) येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास ‘विशेष बाब’ म्हणून मान्यता मिळाली आहे.

यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला. (Guardian Minister Bhuse statement Upgradation of Rural Hospital in Dabhadi to Upazila Hospital)

दाभाडी येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम, तसेच पदनिर्मिती होऊन नागरीरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातील.

दाभाडीसह परिसरातील गावांच्या नागरिकांना आरोग्यसेवा अधिक गतिमान व सुलभतेने पुरविण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय फायदेशीर ठरणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे दाभाडी व परिसरातील गावांच्या नागरिकांना, महिला, बालकांना आरोग्य सोयीसुविधांचा लाभ मिळणार असल्याने सरपंच प्रमोद निकम यांच्यासह ग्रामस्थांनी श्री. भुसे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT