Guardian Minister Dada Bhuse while giving information about the approval and approval of Amrit Phase-2 Underground Sewer Project in a press conference at the Government Rest House on Wednesday.
Guardian Minister Dada Bhuse while giving information about the approval and approval of Amrit Phase-2 Underground Sewer Project in a press conference at the Government Rest House on Wednesday. esakal
नाशिक

Dada Bhuse | शहरासाठी अमृत अभियान अंतर्गत 500 काेटीची भुयारी गटार योजना मंजुर : पालकमंत्री भुसे

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या मलनिस्सारण (टप्पा-२) भुयारी गटार योजनेस राज्य शासनाने बुधवारी (ता.२२) मंजुरी दिली.

या योजनेसाठी ४९९ कोटी ६ लक्ष रुपयांच्या प्रकल्पास मान्यता देण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी काढला आहे.

या योजनेची मंजुरी शहरवासियांसाठी सुवर्णक्षण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव दौऱ्यात दिलेल्या शब्दाची पुर्तता केल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (Guardian Minister dada Bhuse 500 meter underground sewerage scheme approved for city under Amrit Abhiyan nashik news)

येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, महानगरप्रमुख विनोद वाघ, माजी उपमहापौर निलेश आहेर आदी उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले, की मुख्यमंञ्यांच्या येथील दौऱ्यात भुयारी गटार योजनेची मागणी केली होती.

अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९९ कोटी रुपये मंजुर झाले होते. यातील दहा कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी होते. ८८ कोटीमध्ये ६३ एमएलडीचा एसटीपी प्लान्ट व नदी काठावरील भुयारी गटार, मुख्य वाहिनी आदी कामांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यातील काम सुमारे ८५ टक्के पूर्ण झाल्याचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी या वेळी सांगितले.

श्री. भुसे म्हणाले, संपुर्ण शहरात भुयारी गटार योजना व्हावी, शहरातील रोगराई, डास, मच्छर व दुर्गंधी कायमची दूर व्हावी यासाठी टप्पा क्रमांक २ च्या प्रकल्पाकरिता सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याला यश मिळाले.

ही योजना मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. महानगरपालिकेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखीखाली कार्यादेश झाल्यापासून २४ महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदत आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

वेळेत काम पुर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करु. दरम्यान तळवाडे ते मालेगाव ही पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी चार दशकापेक्षा जुनी आहे. सुमारे शंभर कोटीचा या नवीन जलवाहिनीचा प्रकल्प मंजूरीसाठी अंतीम टप्प्यात आहे.

त्याला लवकरच मंजुरी मिळेल असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक नारायण शिंदे, रविंद्र पवार, राजेश गंगावणे, सुनील काळे, प्रमोद पाटील, शशिकांत निकम, दीपक देसले, केवळ हिरे, पप्पू पवार, चंद्रकांत पठाडे आदी उपस्थित हाेते.

अमृत टप्पा-२ भुयारी गटार योजना

प्रकल्प किंमत - ४९९ कोटी ६ लाख

राज्य शासन हिस्सा- (३३.६७ टक्के) - १८३ कोटी १ लाख

केंद्र शासन अनुदान - (३३.३३ टक्के)- १६६ कोटी ३४ लाख

महानगरपालिकेचा हिस्सा - (३० टक्के)- १४९ कोटी ७१ लाख रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT