Women worshiping a traditional Gudi set up outdoors on Gudi Padva. esakal
नाशिक

Gudhi Padwa 2023 : घरोघरी उभारली मांगल्‍याची गुढी..! चिमुकल्‍यांपासून ज्‍येष्ठांमध्ये सणानिमित्त उत्‍साह

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हिंदू नववर्ष मानला जाणारा गुढीपाडव्‍याच्‍या सणानिमित्त शहर परिसरात उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळाले. चिमुकल्‍यांपासून ज्‍येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये सणाचा उत्‍साह बघायला मिळाला.

घरोघरी मांगल्‍याची गुढी उभारताना, मित्रपरिवार व आप्‍तस्‍वकीयांना या सणाच्‍या शुभेच्‍छा देताना आनंद द्विगुणित झाला होता. (Gudhi Padwa festival 2023 Mangalya Gudhi set up from house to house excitement nashik news)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या गुढीपाडव्‍यानिमित्त बुधवारी (ता.२२) शहर परिसरात चैतन्‍याचे वातावरण बघायला मिळाले. सकाळी नववर्ष स्‍वागत समितीच्‍या यात्रेत सहभागी होताना व घरोघरी गुढी उभारताना हा सण साजरा करण्यात आला.

अपार्टमेंट, रो- हाउस, बंगल्यावर उभारलेली गुढी लक्षवेधी ठरत होती. या वेळी पारंपारिक वेशभूषेत तयार होताना सहकुटुंब सण साजरा करण्याकडे नाशिककरांचा कल राहिला. एकमेकांना नववर्षाच्‍या शुभेच्‍छा देताना येणारे वर्ष आनंददायी, आरोग्‍यदायी जावो, अशी कामना या वेळी करण्यात आली.

सणाचा गोडवा वाढविण्यासाठी श्रीखंडाची जोरदार खरेदी दिवसभर सुरू होती. श्रीखंड, आम्रखंड खरेदीसाठी सकाळच्‍या वेळी काही दुकानांमध्ये रांगा लागल्‍या असल्‍याचे बघायला मिळाले. तर अनेक घरांमध्ये पुरणपोळी व गोडधोड पदार्थांची मेजवानी करण्यात आलेली होती.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सोशल मीडियावर शुभेच्‍छांचा पाऊस

आपल्‍या परिचितांसह नातेवाईक, मित्र परिवाराला शुभेच्‍छा देण्यासाठी सोशल मिडियाच्या व्‍यासपीठाचा वापर करण्यात आला. व्‍हॉट्‌सॲप, फेसबुकसह अन्‍य विविध माध्यमांतून शुभेच्‍छा संदेश पाठविण्याची लगबग बघायला मिळाली.

गुढीपाडव्‍याची क्षणचित्र-

* चिमुकल्‍यांपासून अबालवृद्धांचा राहिला सहभाग.
* सोने, वाहन खरेदीसाठी साधला मुहूर्त
* घरोघरी उभारण्यात आली गुढी
* पूजा साहित्‍य खरेदीची बघायला मिळाली लगबग
* स्‍वागत यात्रा समितीच्‍या शोभायात्रेत उत्‍स्‍फूर्त सहभाग
* मिष्टान्नाची मेजवानी, पारंपारिक वेशभूषा ठरली लक्षवेधी
* दिवसभर बाजारपेठेत खरेदीची झुंबड
* सायंकाळनंतर शहर परिसरात घटली वर्दळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT