Gudipadva bike rider and partner compulsion helmet in nashik city
Gudipadva bike rider and partner compulsion helmet in nashik city sakal
नाशिक

नाशिक : गुढीपाडव्यापासून दुचाकीवरील दोघांना शहरात हेल्मेटसक्ती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरात रस्ते अपघाती मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी दुचाकीचालकासह आता दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सह प्रवाशांसाठी हेल्मेटसक्तीचा नियम करण्यात आला आहे. येत्या शनिवार (ता. २) पासून शहरात दुचाकीवरील दोघांसाठी हेल्मेटसक्तीच्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे, पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ही माहिती दिली. शहरात पोलिस आयुक्तांनी दुचाकी चालकांसाठी हेल्मेटसक्तीचा नियम सुरू केला आहे. ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ नियमाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार साधारण वर्षापासून सुरू असलेल्या या नियमाच्या अंमलबजावणीसाठी सुरवात झाली आहे.

हेल्मेट न वापरल्यास संबंधितांना प्रबोधन जनजागृतीसह प्रशिक्षणाचा नियम केला आहे. दोन तासांच्या प्रशिक्षणानंतरही हेल्मेट न वापरणाऱ्यांना दंडाची तरतूद करण्यात आली आहे. शहरात या नियमाला सुरवातीला विरोध झाला, मात्र कालांतराने दंड वसुलीसाठी हेल्मेटसक्तीचा नियम नसल्याचे सामान्य नागरिकांना पटवून देण्यात पोलिसांना यश आल्याने अनेक भागात हेल्मेटसक्तीला प्रतिसाद मिळू लागला. विनाहेल्मेट पेट्रोलपंपावर पेट्रोल न देण्याचा नियम करण्यात आला आहे. मात्र त्याचा पुढचा टप्पा म्हणून पोलिसांनी येत्या २ एप्रिलपासून शहरात दुचाकीचालक आणि दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या सह प्रवाशाला हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. त्याची अंमलबजावणी होणार आहे.

२ एप्रिलपासून शहरात दुचाकी चालकासह दुचाकीवर बसणाऱ्या सह प्रवाशाला हेल्मेट वापरण्याचा नियम करण्यात येणार आहे. शहरात सगळीकडे या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

- दीपक पांडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT