Gudipadwa  esakal
नाशिक

गुढीपाडव्यामुळे बाजारपेठेत चैतन्य; महागाईमुळे मजुर हतबल

दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : गुढीपाडव्यामुळे (Gudipadwa) बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असले तरी मजुरीसह साखर व अन्य वस्तूंच्या दरांत मोठी वाढ झालेली आहे. परंतु त्या तुलनेत भावात वाढ न झाल्याने गुढीपाडव्यासाठी हार-कडे बनविणारे व्यावसायिक हतबल झाले आहे. गुढीपाडव्याला हिंदू धर्मियांच्या घराघरांत गुढी उभारण्याची प्राचीन परंपरा आहे. या गुढीला फुलांच्या हारासह साखरेच्या पाकापासून बनविलेला हार घालण्याचीही प्रथा आहे.

त्यासाठी असे हार- कडे बनविणाऱ्यांची गुढीपाडव्याच्या महिनाभर आधीपासूनच लगबग सुरू होते. शहरातील अनेक व्यावसायिक त्यासाठी सक्रिय असतात. मात्र, यंदा कारागीरांसह अन्य सामग्रीच्या दरांत मोठी वाढ होऊनही भावात फारशी वाढ न झाल्याने अनेक उत्पादकांसह होलसेल विक्रेते त्रस्त आहेत. होलसेल भावात १३० ते १६० रुपये दरांत हार-कडे उपलब्ध आहेत. तर किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलोने उपलब्ध आहेत. याशिवाय साखरेपासून बनविलेले कडे १० ते २० रूपयांत तर नारळ २१ ते ५१ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कोरोनामुळे गत दोन वर्षापासून व्यवसायावर परिणाम झाला होता. यंदा बाजारपेठ खुली झाली खरी, परंतु भावात वाढ न झाल्याने जेमतेम नफ्यावर हा व्यवसाय सुरू असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले.

खर्चात मोठी वाढ

साखरेच्या पाकापासून हार- कडे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारागिरांची गरज भासते. परंतु पूर्वीसारखे आता या कामाचे कारागीर उपलब्ध होत नाहीत. एकीकडे हार- कडे बनविणाऱ्या कारागिरांच्या मजुरीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे भावांत फारशी वाढ न झाल्याने हा व्यवसाय आता आतबट्ट्याचा झाल्याने अनेक उत्पादकांनी सांगितले. या कामासाठी आठ ते दहा कारागिरांची आवश्‍यकता असते. परंतु पूर्वीसारखे आता कारागीर उपलब्ध होत नाहीत, जे आहेत, त्यांनीही मजुरीत वाढ केली केल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

"साखरेच्या पाकापासून हार- कडे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारागिरांची आवश्‍यकता असते, परंतु आता मजुरीत मोठी वाढ झाल्याने व्यवसाय करणे आतबट्ट्याचे बनले आहे."

-अनिता कस्तुरे, हारकडे उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT