Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : राष्ट्रहितासाठी ग्रामअभियान गतिमान करा; गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : सेवेकऱ्यांनी घरामध्ये शांत बसून राहण्याऐवजी मानव आणि राष्ट्रहितासाठी घराबाहेर पडून ग्रामअभियानाची चळवळ अधिकाधिक गतिमान करावी, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More appeal to speed up village campaign for national interest nashik news)

दिंडोरी येथील प्रधान सेवाकेंद्रामध्ये रविवारी (ता. १८) साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. त्याप्रसंगी परमपूज्य गुरुमाउलींनी ग्रामअभियानावर भाष्य केले. ते म्हणाले, ज्या गावामध्ये सेवाकेंद्र नाही, त्या गावात जाऊन सेवेकऱ्यांनी ग्रामअभियानाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करावी.

गावागावात स्वच्छता मोहीम राबवावी. स्थानिक दैवताचा मानसन्मान करावा आणि अज्ञानी जनाला ज्ञानी बनवून त्यांना प्रगतीचा मार्ग दाखवावा, हे सेवाकार्य निष्काम भावनेतून करावे. साधू-संतांनी निष्काम कर्मयोगीप्रमाणे जनतेची सेवा केली, हीच भूमिका स्वीकारून सेवेकऱ्यांनी ग्रामअभियान राबवावे, असे गुरुमाउलींनी स्पष्ट केले.

मूल्यसंस्काराचे महत्त्व स्पष्ट करताना गुरुमाउली म्हणाले, भावी पिढीवर सुयोग्य संस्कार होणे ही काळाची गरज आहे. आपले वार्धक्य सुखकर जावे, कोणावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये याकरिता आपले उर्वरित आयुष्य नव्या पिढीवर मूल्यसंस्कारासाठी खर्च करा. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढणार नाही आणि घरोघरी श्रावणबाळ आणि पुंडलिक निर्माण होतील, असे सांगताना त्यांनी पुंडलिकाच्या मातृ-पितृ भक्तीचे उदाहरण दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भगवंत द्वारकेहून पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरीत आले होते तेव्हा पुंडलिक आपल्या वृद्ध माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. या सेवेत खंड पडू नये म्हणून पुंडलिकाने भगवंताला विटेवर उभे राहण्यास सांगितले. पुंडलिकाची ही मातृ-पितृभक्ती सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पांडुरंग समजून घेण्याआधी पुंडलिक समजून घ्यावा, असे विचार त्यांनी मांडले.

माता-भगिनींचा केला गौरव

भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी माता-भगिनींचे योगदान अपूर्व आहे. किंबहुना माता-भगिनींनीच हिंदू संस्कृती जिवंत ठेवली आहे. भारतीय संस्कृतीचे महत्त्व अबाधित राहिल्यामुळेच आज केवळ आपल्याच देशाला ‘भारतमाता’ म्हटले जाते, जगातील इतर कोणत्याही देशाला ‘माता’ म्हटले जात नाही, अशा शब्दांत गुरुमाउलींनी वीर माता-भगिनींचा गौरव केला.

पर्जन्यसूक्ताचे पठण करा

अखिल जीवसृष्टीवर पर्जन्य देवतेची कृपा होण्यासाठी सेवेकऱ्यांनी सुवृष्टी होण्याकरिता पर्जन्यसूक्ताचे नियमित पठण केले पाहिजे. शेती चांगली पिकली तर शेतकरी सुखी होईल आणि शेतकरी सुखी तर जग सुखी होईल, याकडे गुरुमाउलींनी सर्वांचे लक्ष्य वेधले.

नेपाळमधील राजा जनक आणि सीतामातेची भूमी असलेल्या ‘जनकपूर’मध्ये सेवामार्गाचा कृषी मेळावा आयोजित करण्याचा मानस आहे. जनकपूरमध्ये आजही माती, पाणी आणि बीपरीक्षण केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

नवी पिढी शाकाहारी, निर्व्यसनी, सदाचारी आणि निरोगी होण्यासाठी, तसेच व्यसनाधीनता आणि कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी गुरुमाउलींनी काही आध्यात्मिक सेवा आणि वास्तूदोषावरही काही उपाययोजना सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT