Gurumauli Annasaheb More guiding the devotees at Swami Samarth Seva Marg Pradhan Kendra and Servants present esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : माळकरी, टाळकरी अन् वारकरी हे धर्म, देश, संस्कृतीचे रक्षक : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : समस्त वारकरी, टाळकरी आणि माळकरी हे धर्म, कुटुंब, देश अन् संस्कृतीचे रक्षक आहेत, अशा शब्दात अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी आषाढी एकादशीनिमित्त समस्त वारकरी बंधूंचा गौरव केला. (gurumauli annasaheb more guidance Malkari Talkari and Warkari are protectors of religion country and culture nashik news)

दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवार (ता.२९) रोजी साप्ताहिक प्रश्नोत्तरे मार्गदर्शन आणि सत्संग समारोह सेवेकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामध्ये पार पडला. योगायोगाने आषाढी एकादशीच्या पर्वावर सेवेकऱ्यांना गुरुमाउलींच्या दर्शन आणि आशीर्वादाचाही योग जुळून आला.

सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवालाही आषाढी एकादशीपासून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी गुरुमाउलींनी पंढरपुरात पांडुरंगाचे झालेले आगमन, पुंडलिकाची मातृ- पितृ- भक्ती याबरोबरच गुरू-शिष्याचे नाते या विषयावर अत्यंत प्रासादिक मार्गदर्शन केले.

गुरुमाउली म्हणाले की, आज लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गेले आहेत मात्र तोच पांडुरंग भक्त शिरोमणी पुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारकेहून पंढरीला आला होता. तेव्हा मातृ-पितृ भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या पुंडलिकाने भगवंताला विटेवर उभे राहण्यास सांगितले होते. तेव्हापासून म्हणजे अठ्ठाविसाव्या वैवस्वत मन्वंतरापासून पांडुरंग विटेवर उभे आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भक्त पुंडलिकाने नतद्रष्टांपासून धर्म, देश आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी वारकरी, टाळकरी आणि माळकरी या तीन बटालियन तयार केल्या होत्या. आजही या बटालियन अत्यंत श्रद्धेने आणि एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत. गावामध्ये एखादा चोर, लुटारू आला तर त्याच्यावर माळकरी लोक लक्ष ठेवून असत आणि त्याला गावच्या वेशीवरुन हद्दपार करीत असत, मात्र चोर ऐकत नसेल तर टाळकरी लोक त्या चोराच्या कपाळी भलेमोठे टाळ हाणत असत.

इतके करूनही चोर किंवा अट्टल लुटारू ऐकला नाही तर हातातील भगवे झेंडे काढून त्या वेळूच्या काठीने वारकरी लोक त्या बदमाशाला बडवून काढत असत. अशा प्रकारे कुटुंबाचे, गावाचे आणि संस्कृतीचे रक्षण होत असे, असा गौरवपूर्ण उल्लेख गुरुमाउलींनी केला.

गुरुमाउलींनी गुरू -शिष्याचे नाते अनन्यसाधारण असून राम -कृष्ण आणि श्री दत्तात्रेय महाराज हे परब्रह्म असूनही त्यांनी गुरू केले होते, याकडे लक्ष वेधले. पाच गुरू ज्याला लाभले त्याचे जीवन धन्य झाले असे त्यांनी नमूद केले.

गुरू अनेक भेटतील मात्र सत्शिष्य होण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे का? याचा प्रत्येकाने विचार करावा, असेही ते म्हणाले. मूल्यसंस्कार, आरोग्य, विवाह संस्कार, वास्तुशास्त्र, कृषी, प्रश्नोत्तरे, मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती आदी महत्त्वपूर्ण विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रारंभ

अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला आषाढी एकादशीपासून प्रारंभ झाला आहे. श्री.क्षेत्र दिंडोरी प्रधान केंद्र आणि गुरुपीठातील सभामंडपात स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून गुरुपूजन आणि गुरुपदाचा विधी सुरू झाला आहे. शुक्रवार (ता.३०) व १ जुलै असे दोन दिवस श्री. त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात परमपूज्य गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत गुरुदर्शन सोहळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT