Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : जीवसृष्टीसह राष्ट्रहितासाठी सेवाकार्य करा : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : राष्ट्रहित आणि अखिल जीवसृष्टीच्या उद्धारासाठी श्री स्वामी सेवाकार्य करा, असा उपदेश अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केला. (Gurumauli annasaheb more statement about Do service for national interest with life nashik news)

दिंडोरी येथील प्रधान सेवाकेंद्रात गुरुवार (ता.१५) रोजी साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह सेवेकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामध्ये पार पडला. त्याप्रसंगी परमपूज्य गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांना संबोधित केले. गुरुमाउली पुढे म्हणाले की, सेवेकऱ्यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला नेहमी प्राधान्य द्यावे.

वैयक्तिक समस्या सुटण्यासाठी सेवा करण्याऐवजी दु:खी व्यक्तीचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी अर्थात समस्त जीवसृष्टीच्या उद्धारासाठी सेवाकार्य केल्यास त्यातून वैयक्तिक प्रश्नही सुटतात असा आजवरचा अनुभव आहे. सेवेकऱ्यांनी सदैव राष्ट्रहिता बरोबरच सामाजिक ऐक्य, सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सद्भावना वाढीस लागावी यादृष्टीनेच सेवाकार्य केले पाहिजे असे गुरुमाउलींनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दैनंदिन आध्यात्मिक सेवेबद्दल गुरुमाऊलींनी सांगितले की, शाकाहारी आणि निर्व्यसनी राहून श्री. स्वामी चरित्राचे रोज क्रमश: तीन अध्याय आणि पंचमहायज्ञाबरोबरच ‘श्री. स्वामी समर्थ’ या मंत्राचा अकरा माळ जप करणाऱ्या सेवेकऱ्यांच्या कोणत्याही समस्या शिल्लक राहत नाहीत, त्याचा संपूर्ण योगक्षेम श्री. स्वामी महाराज चालवितात, या सेवेमुळे सेवेकरी दु:खमुक्त होतो. त्याचबरोबर गुरुवारी पुरुषांनी तर मंगळवारी माता-भगिनींनी उपवास करावेत. आणि घराघरात-गावागावात स्वामी सेवाकार्य पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.

खरीप हंगामासाठी पाणी, बी, व माती परीक्षण करुनच पेरणी करावी आणि मुला-मुलींचे विवाह कमी खर्चात, विना-सोनं-नाणं, विना हुंडा या पद्धतीने केल्यास वैवाहिक सुख लाभेल. वास्तूदोषावर वेळीच योग्य ती उपाययोजना करुन आर्थिक संकटे व आजारपण टाळता येते, असेही गुरुमाउलींनी नमूद केले.

गुरुमाउलींच्या हितगुजानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी अत्यंत आनंदाने पालखी परिक्रमेमध्ये सहभाग घेतला. दर गुरवारी व रविवारी दिंडोरी प्रधान केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाउलींच्या उपस्थितीत प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन व सत्संगाचा उपक्रम राबविला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT