Devotees who came for Gurumauli Annasaheb's blessings and darshan esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More: कुलधर्म, कुलाचार नव्या पिढीपर्यंत पोचवा : गुरुमाऊली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : आपल्यासमोर आज जे विविध प्रश्न आणि लहानमोठया समस्या, अडीअडचणी आहेत, त्यांचे मूळ कारण म्हणजे आपणास कुलधर्म, कुलाचाराचा पडलेला विसर. आज अनेक कुटुंबामध्ये या अत्यंत मूलभूत गोष्टीबाबत आस्था न राहिल्याने आपली कौटुंबिक व्यवस्था भरकटत चालली आहे.

यामुळे आधी कुटुंबातील जबाबदार महिला, पुरुषांनी याबाबत माहिती करून घेऊन ही कुलधर्म कुलाचाराची जबाबदारी नवीन तरुण पिढीकडे सोपवणे खूपच गरजेचे आहे असे आवाहन गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More statement Kuladharma Kulachara to new generation nashik news)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या दिंडोरी येथील प्रधान केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊली यांचे आशीर्वाद व दर्शनासाठी रोजच स्वामीभक्त, सेवेकरी, भाविक यांची रिघ लागलेली असते.

परंतु गुरुवार आणि रविवारी दिवसभरात सुमारे पन्नास हजार लोक दिंडोरी दरबारात येतात. त्यांना गुरुमाऊली वैयक्तिक व सामुदायिकरित्या मार्गदर्शन करतात. आजच्या मार्गदर्शनात गुरुमाऊलींनी कुलधर्म, कुलाचार या अत्यंत मूलभूत, महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली.

कुलाचाराबाबत सर्वसामान्यांमध्ये अत्यल्प माहितीमुळे खूपच गैरसमज दिसून येतात असे सांगून गुरुमाऊली म्हणाल्या, आपले कुलदैवत आणि कुलदेवता हे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतातच, पण कुटुंबाची समृद्धी, सुख, आरोग्यसंपन्नता याची काळजी घेतात.

म्हणून त्यांचा नियमित मानसन्मान, सेवा आपल्या हातून घडायला हवी. वर्षातून एकदा तरी खंडोबा आणि माता रेणुका, तुळजा भवानी, महालक्ष्मी, सप्तश्रृंगी यापैकी एक असलेल्या आपल्या कुलदेवीस जाऊन त्यांचा मानसन्मान करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा मानसन्मान करण्याची अत्यंत साधीसोपी पद्धतही गुरुमाऊलींनी सांगितली. जेजुरीत जाऊन खंडोबास धोतर, उपरणे, सव्वापाव... सव्वाकिलो भंडारा आणि पुरण वरणाचा नैवद्य द्यावा. याचप्रमाणे कुलदेवीस हिरवी साडी, चोळी, पुरण, वरणाचा नैवेद्य द्यावा.

मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करावे. एवढे जरी केले तरी आपणावर या दैवतांचा आशीर्वाद कायम राहतो.

दर रविवारप्रमाणे आज सकाळी आरतीनंतर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करण्यात आले. साडेदहाला गुरुमाऊली यांनी मार्गदर्शन केले. दुपारी सर्वांनी पालखी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.

प्रश्नोत्तर मार्गदर्शन करणाऱ्या सेवेकऱ्यांचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. अनेक समस्या घेऊन आलेल्यांना हे सेवेकरी विनामूल्य मार्गदर्शन करताना दिसून आले. अवघड, गंभीर, गुंतागुंतीच्या प्रश्नांवर गुरुमाऊलींनी स्वतः मार्गदर्शन केले.

दरम्यान येत्या दहा जूनला नेपाळमध्ये होणाऱ्या महामेळाव्यात ज्या सेवेकऱ्यांना उपस्थित राहता येणार नाही, त्यांनी आपापल्या घरी तिच सेवा करावी असे सुचविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT