Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : स्वामींकडे अभेद्य भक्ती मागा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : प्रभू रामचंद्रांकडे श्री रामदास स्वामींनी अभेद्य भक्ती मागितली, त्याच प्रकारे सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे अभेद्य भक्ती मागावी, असा उपदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. २३) केला. (Gurumauli Annasaheb More statement of Seek undivided devotion to Swami nashik news )

सेवामार्गातर्फे श्री दत्त जयंती सप्ताह अत्यंत श्रद्धापूर्वक आणि उत्साही वातावरणात सुरू झाला आहे. शनिवारी (ता. २३) गुरुमाउलींचे नामसप्ताहानिमित्त विशेष हितगूज झाले. या वेळी गुरुमाउली मोरे यांनी गुरुचरित्र ग्रंथ, त्यातील लीला, दत्त महाराजांचे आविष्कार याविषयी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले.

गुरुमाउली मोरे म्हणाले, की दत्त महाराजांचा पूर्ण अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पिठापूर ही जन्मभूमी, तर कुरवपूर ही कर्मभूमी राहिली आहे. बिघडलेली तत्कालीन आध्यात्मिक घडी पूर्वपदावर आणण्याचे काम श्रीपाद श्रीवल्लभ यांनी केले. त्यांच्यानंतर श्री नृसिंह सरस्वती यांनी संपूर्ण देशभरात धार्मिक कार्य केले.

त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी संपूर्ण देशभरात पायपीट करून अनेक सिद्ध पुरुष निर्माण करून त्यांच्याद्वारे राष्ट्रहिताचे काम केले. आजही स्वामी महाराजांचा आविष्कार सुरू आहे. सन ११४९ मध्ये पंजाबजवळच्या छेलीखेडा गावी धरणीमाता दुभंगून श्री स्वामींची आठवर्षीय बालक मूर्ती प्रकटली. आजही त्यांचे कार्य जोमाने सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज आपण श्रीमद गुरुचरित्र सप्ताह करीत आहोत. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूरमध्ये अजोड कार्य केले. गुरुचरित्रातील ४८ अध्याय ज्या जागेत घडले, त्याच जागेवर आज दत्तपीठ उभे राहिले आहे, याकडे त्यांनी सेवेकऱ्यांचे लक्ष वेधले.

आपल्यातील अहंकार जाण्यासाठी गाणगापूरमध्ये पाच घरे माधुकरी मागावी, असे सांगतानाच जनतेची दुःखे स्वीकारण्यासाठी दत्त महाराजांनी झोळी घेतली आहे, असे त्यांनी नमूद केले. या वेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खरंच वीस दिवसांमध्ये NDA मध्ये येतील का? आमदाराचा नेमका दावा काय?

Ind vs Ire T20 WC24 : 5 जूनला भारत-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द तर… कोणाला होणार फायदा?

Share Market Today: आज शेअर बाजारात काय होणार? इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

World Bicycle day 2024: या देशाचे पंतप्रधान मर्सिडीज-BMW तून नाही, तर सायकलने जातात संसदेत, संपूर्ण देश आहे सायकलप्रेमी

Latest Marathi News Live Update: विरार ते दहिसर मार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT