Mandakini Tai More on behalf of the Sevakari family during the ceremony held at Samarth Gurupeeth on Saturday. esakal
नाशिक

Annasaheb More Birthday | स्वामीसेवा घराघरांत पोचविण्याचा ध्यास घ्या : गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

स्वामीसेवा घराघरात पोहचविण्याचा ध्यास घ्या (Word Count : 342 CC : 25 Page Baskets: NSKMAIN3 Locations: -)

त्र्यंबकेश्वर : .

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा घराघरांत, मनामनात पोचवून ती रुजविण्यासाठी आणि त्या माध्यमातून वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर समस्या, अडीअडचणी आहेत त्यांची सोडवणूक करून समर्थ, सुखी राष्ट्र निर्मितीचा सर्व सेवेकऱ्यांनी ध्यास घ्यावा, असे आवाहन गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More statement on his Birthday Aim to bring Swamiseva to homes nashik news)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात प. पू. अण्णासाहेब मोरे यांचा अभीष्टचिंतन सोहळा शनिवारी (ता.१८) आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी देश व देशाबाहेरून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या सेवेकऱ्यांशी हितगूज करताना गुरुमाऊलींनी हे आवाहन केले.

संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख सक्रिय सेवेकरी उपस्थित होतेच पण या शिवाय दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, तमिळनाडू, तेलंगणा, दिव, दमण, सिल्वासा यासह दुबई, इंग्लंड, अमेरिका आणि न्यूझीलंड येथून सेवेकऱ्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली हाच धागा पकडून गुरुमाऊली म्हणाले, ‘आज सेवामार्गाचे काम साता समुद्रापार पोचलं आहे. आज जगासमोर अनेक निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटे आहेत. यातून मानवाची सुटका करण्यासाठी माता भगवती आणि महादेव आणि स्वामी महाराजांना आपण विविध सेवेच्या माध्यमातून साकडं घालतो आहोत.ते आपल्या आर्त हाकेस निश्चितच साद देतील. विशेषतः समर्थ भारत माता उभी राहावी म्हणून आध्यात्मिक सेवेबरोबरच विविध समाजपयोगी उपक्रम आपण हाती घेतले आहेत त्यांना गाती द्या.’

५ मार्च पासून सेवेकऱ्यांनी देशभरातील समर्थ केंद्राच्या माध्यमातून जनसेवा अभियान हाती घेतले होते. या अभियानात हजारो सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला आणि लाखो लोकांपर्यंत ते पोचले. या जनसेवा अभियानात गावागावातील मंदिर, नद्यांची स्वच्छता, आरोग्य व रक्तदान शिबिरे, वस्त्रवाटप, अन्नदान असे उपक्रम हाती घेण्यात आले तर अष्टविनायक, सर्व ज्योतिर्लिंग, श्री दत्त पीठे, सर्व शक्तिपीठात दुर्गासप्तशती, गणपती अथर्वशीर्ष, गुरुचरित्राची सेवा रुजू करण्यात आली.

आजच्या सोहळ्यासाठी बाहेरगावच्या सेवेकऱ्यांचे कालपासूनच आगमन झाल्याने दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी दिसून येत होती. आज भल्या पहाटेपासूनच गुरुपीठात स्त्री पुरुष सेवेकऱ्यांची आणि आयोजकांची लगबग सुरू होती. सकाळी साडेदहा वाजता आरती झाली त्यानंतर गुरुमाऊलींचे व्यासपीठावर आगमन झाले. ग्रंथतुला करण्यात आली. या ग्रंथाचे मोफत वाटप करण्यात आले. चंद्रकांतदादा व नितीनभाऊ तसेच आबासाहेब मोरे यांनी हा सोहळा नीटनेटका पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Remarks :

कवर पान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT