पान एक
----------------
07529
सटाणा : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकातर्फे शहरातील दुकानात छापा टाकून सुरू असलेली तपासणी.
सटाण्यात दोन सुपारी सेंटरमधून ८६ हजारांचा गुटखा जप्त
अन्न व औषध प्रशासनाकडून दुकानाचे कुलूप तोडून कारवाई
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. १८ : शहरात शासनाकडून प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या साठवणूक आणि विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. शहरातील दोन प्रमुख सुपारी सेंटरवर छापे टाकून तब्बल ८६ हजार ५२२ रुपये किमतीचा अवैध व प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण पाच जणांविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (ता. १७) केलेल्या या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. पथकाने टिळक रोडवरील जामा मशिदीजवळील ''भारत जनरल स्टोअर्स'' येथे छापा टाकला. कसून तपासणी केली असता दुकानात सुगंधित सुपारीची ८८ पाकिटे आढळली. ५ हजार २८० रुपये किमतीचा हा माल जप्त करून दुकानमालक आसिफ साबिर तांबोळी व अख्तर साबिर तांबोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पथकाने बसस्थानकाजवळील प्रभाकर प्लाझाच्या तळमजल्यावरील ''तौसिफ सुपारी अँड जनरल स्टोअर्स'' येथे धाड टाकण्यात आली. पथक पोहोचले तेव्हा दुकानाचे शटर बंद होते. अधिकाऱ्यांनी दुकानमालकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बाहेरगावी असल्याचे सांगून थोड्यावेळाने फोन उचलणे बंद केले. त्यामुळे पंच व पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिस व पंचांसमक्ष दुकानाचे बाहेरील कुलूप आणि मुख्य सेंटर लॉक तोडून आत प्रवेश करण्यात आला.
दुकानाची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर पानमसाला, विविध प्रकारची सुंगधी तंबाखू, जाफरानी जर्दा आणि सुगंधित सुपारीचा मोठा साठा आढळून आला.
या संपूर्ण मालाची किंमत ८१ हजार २४२ रुपये इतकी आहे. याप्रकरणी शरीफ सुलतान तांबोळी, शहबाज तांबोळी आणि दानिश तांबोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर चांदगुडे आणि चेतन परदेशी यांच्या फिर्यादीवरून सटाणा पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.