Crime news esakal
नाशिक

पकडायला गेले दारू अन् सापडला गुटखा; पिकअपसह मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा दावा केल्याने आश्‍चर्य व्यक्त होते आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परराज्यातील अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने खबरीनुसार गिरणारे परिसरात एका पिकअपला सापळा रचून रोखले. पिकअपची तपासणी केली असता, त्यात दारुऐवजी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिल्यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा दावा केल्याने आश्‍चर्य व्यक्त होते आहे. (Latest Marathi News)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गिरणारे परिसरातून परराज्यातील अवैध मद्यसाठयाची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने गिरणारे येथील जी.पी. फार्मजवळ सापळा रचून पिकअपवर (एमएच १५ एफव्ही २५४६) कारवाई केली. पिकअपमध्ये तपासणी केली असता, त्यामध्ये त्यांना मद्याऐवजी अवैधरित्या बाळगण्यात आलेला परराज्यातील गुटखा हाती लागला. पथकाने भूषण प्रताप वानखेडे (28, रा. तारवालानगर, पंचवटी) या संशयित चालकास ताब्यात घेतले.

पथकाने घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली. त्यानंतर सदरील पिकअप गंगापूर पोलिस ठाण्यात नेला असता, सदरील हद्द ही नाशिक तालुका पोलिस ठाण्याची असल्याने तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक शशिकांत गर्जे, सहआयुक्त (अन्न) गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) विवेक पाटील, अमित रासकर, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी व राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचे रोहीत केरीपाळे यांनी केली.

साडेचौदा लाखांचा गुटखा जप्त

पिकअपमधून (एमएच 15 एफव्ही 2546) तपासणी केली असता 13 लाख 6 हजार रुपयांची विमल पान मसाल्याची 6600 पाकीटे, गुटख्यात मिक्स केले जाणारे व्ही-1 सुंगधीत तंबाखूचे 1 लाख 45 हजार २०० रुपयांचे 6600 पाकीटे असा 14 लाख 52 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच ५ लाख रुपयांचे पिकअप वाहन असा 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT