नाशिक

१ कोटी १४ लाखांचा गुटखा जप्त, ७० लाखांची १६ वाहने ताब्यात

CD
एक कोटी १४ लाखांचा गुटखा जप्त --- ७० लाखांची १६ वाहने ताब्यात; एफडीए-पोलिसांची संयुक्त मोहीम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : राज्य शासनाने गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली असतानाही जिल्ह्यात छुप्या पद्धतीने वाहतूक, साठवणूक आणि विक्री सुरू आहे. या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे कारवाईचा धडाका लावला. ता. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५० जणांवर कारवाई केली असून, एक कोटी १४ लाख २२ हजार ४२६ रुपयांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ७० लाख ७० हजार रुपयांची १६ वाहनेही ताब्यात घेतली आहेत. पोलिसांच्या मदतीने १५, तर स्वतंत्रपणे ३५ कारवाया पोलिसांच्या मदतीने १५ कारवाया करण्यात आल्या, तर अन्न व औषध प्रशासनाने स्वतंत्रपणे ३५ ठिकाणी कारवाया केल्या, अशा एकूण ५० कारवायांमध्ये संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. यापैकी ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनांवरही लक्ष केंद्रीत गुटख्याची अवैध विक्री करणारे व्यावसायिक केवळ दुकानांमधूनच नव्हे, तर वाहनांच्या माध्यमातूनही प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करीत असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे साठा जप्त करण्याबरोबरच वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. सात महिन्यांत १६ वाहने जप्त केली असून, त्यांची किंमत ७० लाख ७० हजार आहे. पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज गुटख्याची विक्री रोखण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करणे आवश्यक असले, तरी त्याचबरोबर या व्यवसायामागील मुख्य पुरवठादार, साठवणूकदार आणि वाहतूकदारांपर्यंत पोहोचणेही महत्त्वाचे आहे. बाहेरून जिल्ह्यात येणारा प्रतिबंधित माल, त्याची साठवणूक होणारी ठिकाणे आणि किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा यावर लक्ष केंद्रित केल्यास अवैध व्यवसायाला आळा घालणे शक्य होईल. कोट प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री, साठवणूक व वाहतुकीवर प्रशासनाचे लक्ष आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा पदार्थांवर बंदी असताना, त्यांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने संशयित ठिकाणी तपासणी व कारवाई केली जाते. यापुढेही कारवाई सुरू राहील. प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा साठवणूक आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. - दीनानाथ शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

Video: जंगलाचा क्रूर कायदा! माकडाला उड्या मारण्याची शिक्षा, सिंहिणीने जिवंतच फाडलं...

Latest Marathi News Live Update : भारतीय हवाई दलाकडे लढाऊ विमानांची कमतरता

DIWALI DIYA LIGHTING TIPS AND TRICKS: दिवाळीत वाऱ्यामुळे पणत्या वारंवार विझतायत? दिवे तेवत ठेवण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होतेय 'ही' ट्रिक!

Satara News: महामार्गावरील वाहतूक काेंडी लांबणारच! शेतकरी संघटनांचा कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम... अन्यथा जिल्हा बंद

SCROLL FOR NEXT