Jailed esakal
नाशिक

Nashik Crime: वावीत 12 हजारांचा गुटखा जप्त! किराणा दुकानचालकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : वावी (ता. सिन्नर) येथील एका किराणा दुकान व जनरल स्टोअर्समध्ये मंगळवारी (ता. ८) सायंकाळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ हजार १४० रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला.

संबंधित दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, बुधवारी (ता. ९) त्यास सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची २३ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. (Gutkha worth 12 thousand seized in Vavi 14 days judicial custody for grocery shopkeeper Nashik Crime)

मंगळवारी वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांना घोटेवाडी रस्त्यावरील साई चैतन्य किराणा आणि जनरल स्टोअर्समध्ये गुटखा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली.

त्यावरून स्वतः श्री. लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक बी. आर. आहेर, हवालदार सतीश बैरागी, भागवत कुरवाडे, शहाजी शिंदे, शैलेश शेलार यांनी किराणा दुकानात झडती घेतली असता, गुटखा आणि सुगंधित पान मसाला गोण्यांमध्ये आढळून आला.

जप्त केलेल्या मालाची किंमत १३ हजार १४० रुपये आहे. याबाबत पोलिस शिपाई गोरक्षनाथ ऊर्फ शैलेश शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात दुकानचालक विजय निवृत्ती गायकवाड (वय ३९, रा. वावी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. उपनिरीक्षक आहेर, पोलिस शिपाई शेलार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT