crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : शहर, परिसरातून 75 हजाराचा गुटखा जप्त; 5 जणांना अटक

शहर व परिसरात जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांचे विशेष पथक व स्थानिक पोलिसांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर व परिसरात जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांचे विशेष पथक व स्थानिक पोलिसांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रोज कारवाई करूनही अवैधरीत्या गुटखा विक्री सुरुच आहे. (Gutkha worth 75 thousand seized from city and locality nashik crime news )

शहरातील मोहनबाबा नगर भागात अनिस मुर्तुजा अहमद (रा. गल्ली नं. १, हिरापुरा) याच्याकडे किल्ला पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारचा गुटखा, जर्दा असा सुमारे ४६ हजार ६३० रुपयांचा ऐवज जप्त केला. तालुक्यातील चिखलओहोळ शिवारात आई भवानी हॉटेल व पान स्टॉलवर दुसरी कारवाई करण्यात आली.

तालुका पोलिसांनी राजेंद्र चव्हाण (वय ४८, रा. चिखलओहोळ) याच्या पान दुकानातून गुटखा, तंबाखू असा सुमारे १६ हजार ७०६ रुपये किमतीचा गुटखा जप्त करून अटक करण्यात आली. द्याने शिवारातील रमजानपुरा येथील जावेद शेख युसूफ (३७, रा. अश्रफनगर) यांच्या मालकीचा जावेद किराणा दुकानावर रमजानपुरा पोलिसांनी छापा टाकून ७ हजार ४९ रुपये किमतीची गुटख्याची गोणी जप्त केली. संशयित जावेदला अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने मोतीपुरा भागातील अन्नू शेठ मशिदीजवळील अब्दुल मलीक मोहम्मद (वय ३८, रा. किल्ला) याच्या पान दुकानावर छापा टाकून ७८८ रुपयांचा गुटखा जप्त केला. याच पथकाने मोहनबाबा नगर मधील शाहीद निहाल अहमद (वय ४२) याच्या पान दुकानावर छापा टाकून ४ हजार ६१४ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

उपनिरीक्षक श्री. भदाणे, एस. एन. देवरे, श्री. अहिरराव, हवालदार श्री. भामरे, पोलिस शिपाई मदन रामराजे, विलास महाले, पंकज भोये, रतीलाल वाघ, सचिन वऱ्हाडे आदींनी ही कारवाई केली. या प्रकरणी किल्ला, रमजानपुरा व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT