MLA Dilip Bunkar respectively while learning about the woes of hail affected farmers
MLA Dilip Bunkar respectively while learning about the woes of hail affected farmers esakal
नाशिक

Unseasonal Rain : शनिवार ठरला कर्दनकाळ! कुंभारी, पंचकेश्‍वरमधील द्राक्षांना गारपिटीचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कुंभारी, पंचकेश्‍वर (ता. निफाड)च्या शेतकऱ्यांसाठी शनिवार (ता. १८)ची सायंकाळ कर्दनकाळ ठरली. साधारण पाचच्या सुमारास वीस एमएमपर्यंतच्या गारा गोड, रसाळ द्राक्षघडांना तडाखा देऊन गेल्या. त्यामुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. (Hail hit grapes in Kumbhari Panchkeshwar Unseasonal Rain nashik news)

काढणीला आलेले द्राक्षघडांचे अवघ्या पंधरा मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अगोदरच कर्जाचा डोंगर असताना द्राक्ष उत्पादकांसाठी ही गारपीट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरली. याशिवाय सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, गहू, कांदा पिके उद्‍ध्वस्त करूनच हे गारांचे संकट ओसरले.

शेतकऱ्यांचे अश्रू अनावर

कुंभारी, पंचकेश्‍वर गावच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती मन सुन्न करणारी होती. बँका, सोसायट्यांचे कर्ज काढून वर्षभर द्राक्षबागांचे संगोपन केले. जिवापाड जपलेल्या द्राक्षबागांतून आर्थिक समृद्धी येईल, या आशेवर शेतकरी होते. काही द्राक्षबागांचे व्यापाऱ्यांशी सौदेही झाले होते.

येणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड, खते, औषधाची उधारी फेडायची, मुलीचे लग्न, शिक्षण अशी स्वप्नं शेतकरी पाहात होते. पण, शनिवारची सायंकाळ शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणारी ठरली. टपोऱ्या गारांनी निर्यातक्षम द्राक्षांना तडे देऊन त्यांची स्थानिक बाजारपेठांमध्येही विक्री होणार नाही, अशी अवस्था करून ठेवली.

काबाड कष्ट करून जोपासलेल्या द्राक्षांवर होणारा गारांचा मारा उघड्या डोळ्यांनी बघताना या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. एरवी कुंभारी, पंचकेश्‍वर गावात रोजची सकाळ मोठ्या आनंदाची असायची. ग्रामपंचायत, सोसायटी सभागृह, मंदिरात सकाळच्या वेळी गप्पांचे फड रंगायचे. पण, गारपिटीने या दोन्ही गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

पंचनामे करणार कोण?

लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बांधावर भेट घेऊन सांत्वन केले. शासनस्तरावरून भरपाई मिळवून देण्याचे आश्‍वासनही दिले. पण, मदत मिळवून देण्यासाठी आवश्‍यक असलेले पंचनामे करणारी यंत्रणाच सध्या संपावर आहे.

महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या न्याय्यहक्कासाठी लढत आहेत. त्यामुळे पंचनामे करणार तरी कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचेच पंचनामे करण्याचा निकष असल्याने, शेतकरी त्या कात्रीत अडकायला नको, अशीही चिंता परिसराला भेडसावत आहे.

"मी अल्पभूधारक शेतकरी असून, दोन एकरांवरील द्राक्षबागेचे गारपिटीने पूर्ण नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट मदत जाहीर करून, ती लगेच खात्यावर जमा करावी." - बाळासाहेब घंगाळे, कुंभारी

"अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्षासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी सावरणे शक्य नाही. नुकसानभरपाई देताना शासनाने नियमाची पळवाट शोधू नये. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्यास मराठवाड्याप्रमाणे निफाड तालुक्यातही आत्महत्या होतील." - ज्ञानेश्‍वर घंगाळे, कुंभारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT