HAL  esakal
नाशिक

Nashik News: HALला मिळाले 70 ट्रेनर विमानांचे काम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीला हवाई दलातील नवोदित वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली एचटीटी-४० जातीची विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचे काम मिळाले आहे. केंद्र शासनाने यासाठी सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे एचएएल कारखान्यातील तीन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे कामगारांत उत्साहाचे वातावरण आहे.

विमाने बनविणारी एचएएल ही केंद्र शासनाची मोठी कंपनी असून, ओझर एचएएलमध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.

विविध जातींची यशस्वी विमाने तयार करण्यात ‘एचएएल’ प्रशासनाचा मोठा हातखंडा आहे. परंतु काही वर्षांपासून ‘एचएएल’कडे कामाचा ओघ काहीसा कमी आहे. विमाने उत्पादनाचे वाढीव काम ‘एचएएल’ला मिळावे, यासाठी खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सचिव संजय कुटे, गिरीश पाटील, प्रशांत आहेर, नितीन पाटील आदींनी दिल्ली येथे संरक्षण विभागाचे सचिव अजयकुमार यांची भेट घेतली होती.

नाशिकला ६० विमानांचे उत्पादन

खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, हवाई दलात नव्याने भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली एचटीटी-४० जातीची विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचे काम ‘एचएएल’ला देण्याचा निर्णय सरंक्षण विभागाने घेतला आहे.

त्यातील दहा विमानांची निर्मिती बेंगळुरू येथील एचएएलमध्ये, तर उर्वरित ६० विमानांची निर्मिती ओझर एलएएलमध्ये करण्यात येणार आहे. हवाई दलात दाखल झालेल्या वैमानिकांना एचटीटी- ४० जातीच्या या विशेष ट्रेनर विमानांद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

''एचटीटी-४० जातीच्या विमानांचा वेग ताशी ४०० किलोमीटर असेल. हे विमान एकाच वेळी तीन तास हवेत राहू शकणार असून, ते पूर्णतः भारतीय बनावटीचे आहे. एचटीटी- ४० जातीची विमाने तयार करण्याच्या कामाला येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.'' -हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT