SNR26B23235
राहाता ः जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कालवा अस्तरीकरणाबाबत निवेदन देताना सिमंतिनी कोकाटे.
----------------
कालवा अस्तरीकरणाच्या
कामाला स्थगिती द्यावी
-------------
सिमंतिनी कोकाटेंची विखेंकडे मागणी
------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.२३ ः गोदावरी उजव्या तट कालव्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये कालव्याच्या देखभाल- दुरुस्तीअंतर्गत सिमेंट काँक्रीट अस्तरीकरण सुरु आहे. या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी केली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची राहाता येथे भेट घेवून चर्चा केली.
-----------
राजेंद्र घुमरे, विनायक घुमरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कालव्याच्या आवश्यक देखभाल-दुरुस्तीच्या कामांना विरोध नसल्याचे सांगून अस्तरीकरणामुळे परिसरातील नैसर्गिक पाण्याचा पाझर व भूजल पुनर्भरणावर संभाव्य दुष्परिणाम होणार असल्याने अस्तरीकरणाचा पुनर्विचार व्हावा, असे कोकाटे यांनी सांगितले. अस्तरीकरणाच्या कामाचा तांत्रिक अभ्यास व शेतकऱ्यांशी चर्चा होईपर्यंत कामास स्थगिती द्यावी, अस्तरीकरणामुळे भूजल पुनर्भरण, तज्ज्ञांमार्फत अभ्यास करावा, शेतकरी प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, भूजल तथा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा करावा, स्थानिक परिस्थितीचा विचार करून सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.