Hand pump quenches thirst for 25 years Nashik News esakal
नाशिक

25 वर्षांपासून हातपंप भागवतोय तहान; जलकुंभ मात्र जैसे थे

संदीप पाटील

विराणे (जि. नाशिक) : तालुक्यातील माळमाथ्याला नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्याच्या पूर्वेकडील सायतरपाडे (ता. मालेगाव) हे गाव पाडळदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येते. गावाची लोकसंख्या सुमारे ४५० तर कुटुंबसंख्या १४० आहे. सुमारे पंचवीस वर्षांपासून सायतरपाडे पाणीपुरवठा योजनेपासून (Water supply scheme) वंचीत असून, एक हातपंप (Hand pump) संपूर्ण गावाला पाणी पुरवितो. पिण्याचे पाणी, धुणे, भांडे व घरातील इतर पाण्याच्या गरजा एक हातपंप भागवितो. दहिवाळ पाणीपुरवठा योजनेत गावाचा समावेश असूनही इथला जलकुंभ किरकोळ अपवाद वगळता शोभेची बाहुली बनून कोरडाच असतो.

हातपंप गावासाठी संजीवनीच...

शंभर टक्के गाव पाण्याच्या प्रत्येक गरजेसाठी हातपंपावर अवलंबून आहे. लहान मुले, स्रिया, पुरूषांना सकाळी, सायंकाळी हातपंप हापसून पाणी आणावेच लागते. हातपंपावर नंतर गर्दी होत असल्याने काहींना भल्या पहाटेच पाण्यासाठी उठावे लागते. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पंचायत समितीने निर्माण केलेला हातपंप गावासाठी संजीवनी ठरत आहे. डोक्यावर हंडे, प्लॅस्टिक ड्रम, बैलगाडीवर पाण्याची टाकी, सायकल, मोटारसायकलींवर जसे जमेल तसे पाणी वाहावे लागते. हातपंपाकडे जाणारा रस्ता तीव्र उताराचा आहे. पाणी हापसून एक, दोन हंडे डोक्यावर घेत चढताना ग्रामस्थांची चांगलीच दमछाक होते.

पंचवीस वर्षांपासून सदर हातपंप कधीच कोरडा झालेला नाही. २०१३- १४ च्या भीषण दुष्काळात देखील हातपंप चालूच होता. तेव्हा शेजारील शेरूळ, देवघट गावांची तहान सुद्धा याच हातपंपाने भागवली होती. दहिवाळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शेरूळ येथून सायतरपाडे येथे आली आहे. शेरूळकडून चढ असल्याने जलकुंभावर पाणी चढत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. पंचायत समिती, पाडळदे ग्रामपंचायतीने येथील पाण्याचा प्रश्‍न निकाली काढावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीने लक्ष न दिल्यास पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून उपोषण करू. तसेच हंडा मोर्चा काढून प्रशासनास बांगड्यांचा आहेर देऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

"हातपंपावरच आमचे जीवन आहे. पाणी जीवनावश्यक असूनही आजच्या आधुनिक युगात आमच्या गावात पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली हे आमचे दुर्भाग्यच आहे. प्रशासनाने हातपंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे तरी सपाटीकरण करावे."

- ललेश व्याळीज, सामाजिक कार्यकर्ते, सायतरपाडे

"हातपंप हापसून, पाणी डोक्यावर वाहून अनेकांना मणक्याचे आजार झाले. अनेकवेळा मागणी करून देखील झोपेचे सोंग घेणाऱ्या निगरगठ्ठ प्रशासनाला जाग येत नाही. पाणी अनेक गोष्टींसाठी लागत असून प्रत्येक पाण्याचा थेंब हातपंपावरूनच आणावा लागतो."

- विमलबाई सावकार, ज्येष्ठ महिला, सायतरपाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT