Har Ghar Tiranga latest marathi news
Har Ghar Tiranga latest marathi news esakal
नाशिक

हर घर तिरंगा : शासकीय कार्यालयावर यंदा 75 फुटाचा तिरंगा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : 'आजादी का अमृतमहोत्सवां'तर्गत केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा'अभियान सुरू केले असून याअंतर्गत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य पाच शासकीय कार्यालयांवर ७५ फूट उंचीवरून तिरंगा फडकवला जाणार आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली आहे. (Har Ghar Tiranga 75 feet indian flag on government office this year nashik latest marathi news)

जिल्हाधिकारी गंगाथरण. डी. यांनी जिल्ह्यातील पाच शासकीय कार्यालयांत ७५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारून तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचे काम सुरू असून हे १० आॅगस्टच्या आत पूर्ण केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच कळवण तहसील कार्यालय, निफाड येथे नवीन प्रशासकीय इमारत, येवला येथील प्रशासकीय संकुल आणि मालेगाव येथे पंचायत समिती कार्यालयात हा ७५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून तेथेही युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.

ध्वजस्तंभाच्या शेजारी संविधान स्तंभही उभारला जाणार आहे. ७५ फूट उंचावरून फडकणारा तिरंगा हा दिवस-रात्र कायमस्वरूपी फडकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT