Rickshaw Drivers latest Marathi news esakal
नाशिक

मुजोर रिक्षाचालकांकडून ‘गाइड’ ला दमबाजी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तीर्थाटनासाठी नाशिकला येणाऱ्या भाविकांना धार्मिक स्थळांची माहिती देण्यासाठी मोजकेच टुरिस्ट गाइड‌ आहेत. मात्र, गोदाघाटावरील मुजोर रिक्षाचालकांकडून टुरिस्ट गाइड‌कडे आलेल्या भाविकांना पळवून नेण्याचे प्रकार घडतात.

यातून वाद झाल्यास मुजोर रिक्षाचालक एकत्रित येऊन गाइड‌ला दमदाटी करतात. तर, भाविकांनाही धार्मिकस्थळे दाखविण्याच्या नावाखाली रिक्षात बसवून अवघ्या काही मिनिटांमध्ये फिरवून आणून गोदाघाटावर सोडून देत भाविकांचीच फसवणूक करण्याचे प्रकार करतात. मात्र, याबाबत पोलिस वा पर्यटन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने टुरिस्ट गाइड‌मध्ये तीव्र नाराजी आहे. (harassment by rickshaw drivers on religious places to tourist guides nashik)

सध्या श्रावण महिना असल्याने भाविकांची संख्या अधिक आहे. मात्र, या येणाऱ्या भाविकांसाठी फारशा सोयीसुविधा नाहीत. त्याचा गैरफायदा गोदाघाटावर असलेल्या रिक्षाचालकांकडून घेतला जातो. ट्रॅव्हल बस आल्यानंतर रिक्षाचालकांचा भाविकांभोवती गराडा पडतो. काही भाविकांना थोडीफार माहिती असल्याने ते टुरिस्ट गाइड‌शी संपर्क साधतात.

यावरून मुजोर रिक्षाचालक या टुरिस्ट गाइडशी वाद घालून, दमदाटी करतात आणि त्यांचे भाविक बळजबरीने पळवून नेण्याचा प्रकार करतात. यावरून अनेकदा वादावादीचे प्रसंग घडलेले आहेत. मात्र, रिक्षाचालक संघटित होऊन टुरिस्ट गाइड‌ला धमकावत असल्याने तेही माघार घेतात.

भाविकांना फितविण्याचे काम

टुरिस्ट गाइड‌ हे आलेल्या भाविकांना त्रिवेणी संगम, कपालेश्‍वर मंदिर, गोरेराम मंदिर, रामकुंड, काळाराम मंदिर, रामाची पर्णकुटी, सीतागुंफा, सीता संसार, मरीच वध, तपोवन अशा ठिकाणी नेऊन तेथील धार्मिक, ऐतिहासिक माहिती देतात.

त्यासाठी ठराविक रक्कम ते आकारतात. सदरील स्थळे दाखविण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी जातो. मात्र, रिक्षाचालक हे टुरिस्ट गाइड‌कडील भाविकांना फितविण्याचे काम करतात आणि अव्वाचे सव्वा दर आकारून अवघ्या तासाभरात या धार्मिकस्थळांना दाखवून परत गोदाघाटावर आणून सोडतात.

भाविकांना त्या धार्मिक स्थळांची पुरेशी माहितीही ते देत नाहीत. वा, साऱ्या धार्मिकस्थळांनाही घेऊन जात नाहीत. यातून भाविकांची फसवणूक या रिक्षाचालकांकडून केली जाते.

अधिकृत कोणीही नाही

गोदाघाटावर येणाऱ्या भाविकांना धार्मिकस्थळांची माहिती देण्यासाठी पर्यटन विभागाकडून अधिकृत कोणीही नाही. तर नाशिक दर्शन गाइड‌ संस्थेच्या माध्यमातून २२ ते २५ टुरिस्ट गाइड‌ आहेत. त्यांना पर्यटन विभागाकडून कोणत्याही सुविधा नाहीत. भाविकांकडून मिळणाऱ्या आर्थिक कमाईवरच टुरिस्ट गाइड‌चा उदरनिर्वाह चालतो. मात्र, शासन वा पर्यटन विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने नाराजी आहे.

"देशभरातून भाविक नाशिकला धार्मिक पर्यटनासाठी येतात. त्यांना येथील थार्मिकस्थळांची प्रामाणिकपणे माहिती देण्याचे काम केले जाते. मात्र, सर्वाधिक त्रास रिक्षाचालकांकडून होतो. भाविकांचीही लूट करून फसवणूक केली जाते. त्यामुळे नाशिकचे नाव बदनाम होत असून अशा रिक्षाचालकांवर कारवाई झाली पाहिजे." - श्रीकांत जोशी, टुरिस्ट गाइड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला

Explained: च्यवनप्राशमधील आयुर्वेदिक घटक शरीराला कसे देतात ताकद? जाणून घ्या फायदे

Kolhapur politics : मतदार यादीतील गोंधळ, सुनावणी पुढे ढकलली… महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग; इच्छुकांमध्ये चिंता वाढली

Latest Marathi News Live Update: संसद मार्गावरील निषेध प्रकरणातील आंदोलक न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT