Married women Harassment latest crime news
Married women Harassment latest crime news esakal
नाशिक

दिरास फ्लॅट खरेदीसाठी विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मोठ्या दिरास फ्लॅट घेण्यासाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेकडे पाच लाखाची मागणी करण्यात आली.

पैसे न दिल्याने पतीसह कुटुंबीयांनी तिचा शारीरिक मानसिक छळ करत घरातून हाकलून लावले. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात पतीसह दिर आणि जाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Harassment of spouse for buying flat by husband nashik crime news)

विवाहितेचा विवाह ९ डिसेंबर २०२० ला संशयित पती गणेश तुलसीदास साळुंके यांच्याशी झाला. पहिल्या दिवसापासूनच विविध कारणातून विवाहितेस त्रास देण्यात आला. त्यानंतर सतत तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करण्यात आली.

२७ एप्रिल २०२१ ला संशयित पतीने विवाहितेच्या माहेरच्या लोकांना बोलावून घेतले. त्यांना विवाहितेस माहेरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काही एक न ऐकता त्यांना घरातून काढून दिले.

महिला सुरक्षा निवारण विभागात अर्ज करूनही विवाहितेस नांदण्यासाठी त्यांनी नेले नाही. शेवटी विवाहितेच्या तक्रारीवरून संशयित पती गणेश तुळशीराम साळुंके, दीर अभिजित तुळशीराम साळुंके आणि जाव निकिता अभिजित साळुंके अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT