Drug Crime esakal
नाशिक

Nashik MD Drug Case: एमडी ड्रग्‍ज कारखाना उभारणीसह विक्रीत हरिशपंतचा सहभाग उघड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘एमडी’ (मेफड्रोन) च्‍या उत्‍पादनासाठी शिंदे गावात कारखान्‍याच्‍या उभारणीत मुंबईतील संशयित हरिशपंतचा सहभाग चौकशीतून उघड झाला आहे.

पोलिस कोठडीत असलेल्‍या मुख्य सूत्रधार ललित पाटील (पानपाटील) याच्‍या चौकशीत आणखी विविध खुलासे होत असून, रॅकेट उद्ध्वस्त करण्यासह दोषींवर कारवाईसाठी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळत असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. (Harishpants Involvement Revealed in Selling MD Drugs Factory nashik crime)

पोलिस कोठडीतील सर्वच संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी ललितसह त्याचा भाऊ भूषण पाटील (पानपाटील), अभिषेक बलकवडे, रोहित चौधरी, हरिशपंत, शिवा शिंदे, झिशान शेख यांना गजाआड केले आहे.

शिंदे गाव येथे एमडीचा कारखाना उभारण्यात हरिशपंतने मदत केल्‍याचे उघड झाले आहे. यंत्रसामग्रीसह कच्चा माल पुरवण्यात त्‍याचा हात होता.

तसेच संशयित रोहितला नाशिकच्या कारखान्‍यात एमडी ड्रग्‍जच्‍या उत्‍पादनासाठी ठेवले होते, हेही तपासातून समोर आले आहे.

दरम्‍यान, एमडी ड्रग्‍ज उत्‍पादनासाठी आवश्‍यक असलेले सूत्र (फॉम्युला) कोठून प्राप्त झाला, भांडवल कुणी पुरवले, याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT