Crowd in the market to buy materials esakal
नाशिक

आज हरितालिका पूजन; आदिशक्‍तीच्या पूजनातून तत्त्वांची जपवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाद्रपद तृतीया म्‍हणजे हरितालिका पूजन. या दिवशी महिला व कुमारिका हे व्रत करतात. शंकर पार्वती संवादात हरितालिका कथा सांगितली आहे. श्रावण महिन्यापासून सुरू झालेला चातुर्मासातील दूसरा महिना म्‍हणजे भाद्रपद, श्रावण संपताच भाद्रपदातील लगबग म्‍हणजेच हरितालिका. (Hartalika Puja today Ganeshotsav 2022 Nashik Latest Marathi News)

गणपती आगमनाची चाहुल तसेच गौरी पूजन हे अवघे भाद्रपदाला लागूनच येणारे सण. गणेश चतुर्थीच्या अगोदर म्‍हणजेच तृतीयेला हरितालिकेची पूजा केली जाते. शिवपार्वती ही जगताची माता- पिता म्‍हणून पूजन केले जाते.

स्‍त्री व पुरुष तत्त्व यातून विश्‍वाची निर्मिती झाली म्‍हणून या तत्त्वांचे पूजन तसेच आदिशक्‍तीच्या पूजनातून प्रार्थना केली जाते. दरम्यान, सोमवारी (ता. २९) मुख्य बाजारपेठेत महिला वर्गाची पूजा साहित्‍य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. पत्री साहित्य ३० रुपये, सौभाग्‍यलेणी साहित्‍य १० रुपये, पाच फळे ३० रुपये, असा भाव होता.

हरितालिका व्रत कसे करावे?

सकाळी सुचिरभुत होऊन वाळूच्या शिवलिंगाची स्‍थापना करून त्‍याची पूजा केली जाते. विविध प्रकारची बहुगुणी पत्री, बेल, सौभाग्‍यलेणी, वस्‍त्र अर्पण करून पूजा, आरती, कहाणी केली जाते. महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात. रात्री महिला, सखींसोबत जागरण करतात. दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो.

पार्वती वडिलांवर रूसली असता अलि म्‍हणजेच सखीने पार्वतीला बरोबर नेले म्‍हणजेच ‘हिरता’ व अरण्यात आणले. तिथे पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली, उपवास केला. या व्रताने शिव पार्वतीस प्रसन्न झाले व पत्‍नी म्‍हणून पार्वतीचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे. यामुळे सुहासिनी आपल्‍या सुखी संसारासाठी हे व्रत करतात. तसेच कुमारिका इच्छित पती प्राप्त होण्यासाठी व्रत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT