नाशिक

हस्ती स्कूल पुरस्कार

CD
धुळे : टुडे ३ साठी.... -- फोटो क्रमांक : 33756 नवी दिल्ली: ‘एज्युकेशन वर्ल्ड’तर्फे झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना हस्ती ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष कैलास जैन. -- हस्ती पब्लिक स्कूलला दुहेरी बहुमान -- डिजिटल शिक्षण, दर्जेदार सुविधांसाठी दिल्लीत राष्ट्रीय गौरव सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : दर्जेदार शिक्षण, आधुनिक शैक्षणिक सुविधा, प्रभावी अध्यापन पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज या संस्थेने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. एज्युकेशन वर्ल्डतर्फे जाहीर करण्यात आलेल्या इंडिया स्कूल रँकिंग २०२६-२७ आणि इंडिया ग्रँड ज्युरी रँकिंगमध्ये शाळेला दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील द पुलमन, एरोसिटी येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या इंडिया स्कूल रँकिंगमध्ये हस्ती पब्लिक स्कूलने ‘सुपर ५० बजेट प्रायव्हेट स्कूल’ श्रेणीत संपूर्ण भारतात ३८वे, महाराष्ट्रात १५वे तर धुळे जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले. या कामगिरीबद्दल शाळेला बेस्ट बजेट प्रायव्हेट स्कूल हा राष्ट्रीय सन्मान मिळाला. हा पुरस्कार हस्ती ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष कैलास जैन यांनी नंदिनी गुप्ता आणि रिद्धी अग्रवाल यांच्या हस्ते स्वीकारला. तसेच, इंडिया ग्रँड ज्युरी रँकिंगमध्ये बेस्ट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड लर्निंग इकोसिस्टीम श्रेणीत शाळेने संपूर्ण भारतात चौथा, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अध्ययन व्यवस्थेतील उत्कृष्ट कार्याबद्दल हा बहुमान मिळाला. हा पुरस्कार अध्यक्ष कैलास जैन यांनी लॉरेन्स स्कूल व डेली कॉलेजचे माजी मुख्याध्यापक डॉ. सुमेर सिंह, शिक्षणतज्ज्ञ फातिमा आगरकर यांच्या हस्ते स्वीकारला. शाळेच्या या यशाने दोंडाईचा परिसराच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या दुहेरी यशाबद्दल हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन, कार्याध्यक्ष किशोर जैन, संचालक मंडळाने शाळेच्या प्राचार्या रझिया दाऊदी, सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुरस्कारांसाठी समन्वयिका सकिना भारमल, समन्वयक महेश डिगराळे, संगणक शिक्षक पंकज पाटील, गौतमी गिरासे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

मतदार यादीत नाव असताना फॉर्म ६ कशाला? SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

SCROLL FOR NEXT