नाशिक

शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांसाठी आरोग्याचीही काळजी; चाळीसगाव नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबिर

CD
CSG26B02981 चाळीसगाव : पालिका सफाई कामगारांना आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. खैरनार. ---------------- चाळीसगाव पालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबिर सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ३ : शहराच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने चाळीसगाव पालिकेत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण व मुख्याधिकारी हनमंत बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हे शिबिर घेण्यात आले. यावेळी पालिका दवाखान्याच्या प्रमुख डॉ. खेरनार यांनी सफाई कर्मचाऱ्यांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले. शासनाच्या वतीने सुरू असलेल्या कर्करोग स्क्रीनिंग उपक्रमाची माहिती देताना मुखाचा कर्करोग, महिलांमधील स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत प्राथमिक मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू, गुटखा व इतर व्यसनांमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबतही कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. शिबिरात उपस्थित सर्व सफाई कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, शहर समन्वयक करण चव्हाण व वाल्मीक मरसाळे यांनीही कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक काळजी व आजारांपासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरास प्रशांत जाधव, विजय जाधव, उमेश चव्हाण, नरेंद्र नकवाल यांच्यासह पालिकेतील सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. सफाई कर्मचाऱ्यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT