धुळे : टुडे पान ४ साठी...
--
फोटो क्रमांक : 34298
साक्री : महाआरोग्य शिबिराचे फीत कापून उदघाटन करताना डॉ. सुभाष भामरे. शेजारी पराग बेडसे, रामकृष्ण खलाणे, नारायण पाटील, उषा पवार, चंद्रजीत पाटील, ॲड. गजेंद्र भोसले आदी.
--
वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करावा
--
डॉ. सुभाष भामरे : साक्रीत महाआरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २ : लोकप्रतिनिधींनी वाढदिवसावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी आरोग्य शिबिरांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत साक्री नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष ॲड. गजेंद्र भोसले यांनी वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
माजी केंद्रीय राज्यमंत्री भामरे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे, नगराध्यक्षा उषा पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, निवृत्त कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, साक्री डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अनिल पवार, आबासाहेब सोनवणे, प्रवीण निकुंभे, स्वप्निल भावसार आदी उपस्थित होते.
-
साक्री शहरासह तालुक्यातील शेकडो रुग्णांची या शिबिरात विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये कर्करोग, अस्थी विकार, मज्जा संस्था विकार, स्त्रीरोग, नेत्ररोग, श्वसन विकार, हृदयविकार, दंतविकार, गुदरोग, शल्यचिकित्सा, पचन विकार, मानसोपचार, बालरोग आणि मूत्रपिंड विकार यांसह विविध आजारांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. यात डॉ. राहुल भामरे, डॉ. भूषण वाणी, डॉ. घनश्याम अकलाडे, डॉ. विशाल वळवी, डॉ. ललित नागरे, डॉ. चारुदत्त शिंदे, डॉ. श्रद्धा मोरे, डॉ. वीरेंद्र रोडा, डॉ. कोमलकुमार अहिरराव, डॉ. चिन्मय साळुंखे, डॉ. अनुराग पाटील, डॉ. यश मुथा, डॉ. ज्ञानदीप पाटील, डॉ. अनिकेत नेवाडकर, डॉ. रुपेश बच्छाव, डॉ. कपिल देवांग, डॉ. महेंद्र काळे, डॉ. रौनक मुथा, डॉ. आशिष छाजेड, डॉ. राहुल पाटील, डॉ. दर्शन कलाल, डॉ. शुभम अहिरराव, डॉ. रोहन गायकवाड, डॉ. निखिल शिंदे, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. चेतना काळे, डॉ. अतुल देवरे, डॉ. शरण बसप्पा, डॉ. विशाखा भोसले, डॉ. चेतना खैरनार, डॉ. दीपाली गांगुर्डे आणि डॉ. देवेंद्र देवरे यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.