नाशिक

धुळे आरोग्य भरती प्रश्‍न

CD
धुळे ः टुडे १ साठी, मेन..............(नंदुरबार टुडे १ ला घेता येणे शक्य) -- लोगो छायाचित्र क्रमांक ः 32474 -- कंत्राटी भरती दोन महिन्यांपासून ठप्प! - आरोग्य विभाग : धुळे- नंदुरबारला २५३ पदे रिक्त; निविदेची प्रतीक्षा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी पदभरतीला प्रशासकीय सूचनांच्या अभावामुळे खीळ बसली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानासह (एनएचएम) विविध आरोग्य योजनांमध्ये बाह्यस्रोतांद्वारे (आउटसोर्सिंग) पदे भरण्याची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून रखडली आहे. आरोग्य आयुक्तालयाकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळत नसल्याने राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील निविदा प्रक्रिया रखडली आहे. धुळे जिल्ह्यात ११६, तर नंदुरबार जिल्ह्यात १३७ पदे रिक्त असल्याने उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. - उत्तर महाराष्ट्रात एकूण १,०६५ पदे रिक्त आहेत. यात नाशिक जिल्ह्यात २७६, जळगाव २३६ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ३०० पदांचा समावेश आहे. विशेषतः धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांत आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग आणि आपला दवाखाना या योजनेंतर्गत ही भरती केली जाणार आहे. २०२५- २०२६ च्या मंजूर कृती आराखड्यानुसार ही पदे भरणे अपेक्षित आहे. - सूचनांत अस्पष्टता आरोग्य सेवा अभियान कार्यालयाने २३ जुलै आणि सात ऑगस्ट २०२६ ला निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. मात्र, भरतीच्या अटी व शर्तींविषयी स्पष्टता नाही. यातील महत्त्वाचे अडथळे असे : १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी बिंदुनामावली लागू करणे. १० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती व रजांचे धोरण. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महागाई भत्त्याशी संबंधित मानधनवाढ व अनुदानाची तरतूद. - मार्गदर्शनाची प्रतीक्षा विविध जिल्हा परिषदांनी दोन ते तीन वेळा यासंदर्भात पत्रव्यवहार करून स्पष्टीकरण मागितले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही प्राथमिक चर्चा झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिकृत पत्राची गरज आहे. ही स्पष्टता लवकर न मिळाल्यास ग्रामीण व दुर्गम भागांतील आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT