नाशिक

हृदय तपासणी शिबीरात २५ बालकांची शस्त्रक्रिया व उपचारासाठी निवड

CD
हृदय तपासणी शिबिरात २५ बालकांची शस्त्रक्रिया सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शिबीर सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून जिल्हा महिला रुग्णालयातील जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रात ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी टू- डी इको, हृदय तपासणी व निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. ठाणे येथील किम्स हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात १५० बालकांची हृदय तपासणी करण्यात आली. यापैकी हृदयाशी संबंधित समस्या आढळलेल्या २५ बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर निपटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष राऊत यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी आरबीएसके जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढिवरे, कार्यक्रम सहायक करण वसावे, डीईआयसी व्यवस्थापक प्रितेश खैरनार, किम्स हॉस्पिटलच्या बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोनिया श्रीनिवास, डॉ. उल्हास पाटील, नितीन कोळी व आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरबीएसके पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मोरे, डॉ. सुजाता दहिवेलकर, डॉ. हिरकणी महाले, डॉ. अविनाश चकोर, डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. मोनिका वसावे, डॉ. सुशीलकुमार मराठे, डॉ. सय्यद अरसलान, डॉ. विनोद बाविसकर, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. राकेश पाटील, डॉ. जितेंद्र भंडारी, डॉ. कपिल दुसेजा, महेश नगराळे, प्रितेश खैरनार, भैय्यासाहेब अहिरे, डॉ. एंजल वसावे, बागेश्री पगारे, सुषमा बिरारे आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : संतप्त जमावाच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू ;शहरात पुन्हा झुंडबळी; चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने संताप

Manwat Farmers: घरातील साहित्य विकले, शेती गहाण ठेवली; थकीत बिलांसाठी मानवतमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

प्रदीप पूर्णेकरांच्या घरी Jayant Patil दाखल! नेमकं काय म्हणाले?

MPSC protest Pune : पुण्यातील MPSC आंदोलनावर हायकोर्टाने सरकारला खडसावलं; 'विद्यार्थी समाजविघातक नाही...'

Dharashiv Sugarcane Farmers : ‘ऊसदराच्या बाबतीत उत्तर द्या’, ओमराजे, तानाजी सावंतांसह आमदार, खासदारांना थेट इशारा, धाराशिवचे शेतकरी संतप्त

SCROLL FOR NEXT