nashik sakal
नाशिक

भरणी श्राद्धासाठी रामकुंडावर अलोट गर्दी

कोरोना उद्रेकामुळे गतवर्षी व यावर्षी अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनासह अन्य व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या राज्यात मोठी असून, नाशिकमध्येही त्यामुळे अनेकांना अकाली जीव गमवावा लागला. अशा मृत्यू होऊन वर्ष पूर्ण न झालेल्या अनेकांच्या भरणी श्राद्धासाठी आज सकाळपासून रामकुंडावर मोठी गर्दी उसळली होती. विधीसाठी पुरोहितांची संख्या कमी असल्याने अनेकांना एकावेळी तीन- चार कुटुंबीयांचे विधी पार पाडावे लागले.

कोरोना उद्रेकामुळे गतवर्षी व यावर्षी अनेकांना जीव गमवावा लागला. हिंदू धर्मियांत पितृपक्षात मृत व्यक्तीच्या तिथीच्या दिवशी श्राद्ध तर्पण करण्याची परंपरा आहे. यामुळे पितरांना सुख लाभून ते संतुष्ट होतात, अशी भावना आहे. यंदा कोरोनामुळे अनेकांना आपले जवळचे आप्त गमवावे लागले. परंतु, असा दिवंगतांचे श्राद्ध कधी घालावे, याविषयी अनेकांच्या मनात शंका होत्या. परंतु, ज्या व्यक्तीच्या मृत्युला अद्यापही वर्ष पूर्ण झालेले नाही, अशा दिवंगतांचे श्राद्ध भरणी नक्षत्रावर घातले जाते. भरणी श्राद्धानंतर अशा व्यक्तीचे श्राध्द पुढील वर्षीपासून मृत्युच्या तिथीला घालावे, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.

श्राद्धासाठी चक्क वेटिंग

कोरोनामुळे शहर परिसरातील अनेकांचे निधन झाले आहे. अशा मृत व्यक्तींच्या भरणी श्राद्धासाठी शुक्रवारी (ता.२४) सकाळपासून रामकुंड परिसरात गर्दी झाली होती. श्राद्ध घालणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने अनेकांना चक्क विधीच्या पूर्ततेसाठी हा विधी करणाऱ्या ब्राह्मणांची वाट पाहावी लागत असल्याचे रामकुंडावर फेरफटका मारला असता दिसून आले. यासाठी पुरोहित वर्गांकडे मोठी गर्दी झाल्याने एकाचवेळी तीन- चार कुटुंबीयांचे एकत्रित श्राद्ध विधी करावे लागले. यामुळे रामकुंडावर सकाळपासून गर्दी उसळली होती. याशिवाय पितरांना गोडाधोडाचा घास भरविण्यासाठई तपोवनातही मोठी गर्दी उसळली होती.

अनेकांना आपल्या पितरांच्या मृत्यूच्या तिथीची माहिती नसते. अशा व्यक्तींसाठी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालण्याची प्रथा आहे. या वर्षी ६ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असल्याने या तिथीवर अशा व्यक्तींचे श्राद्ध घालावे.

- सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT