Heavy hail in the eastern part of Igatpuri
Heavy hail in the eastern part of Igatpuri SYSTEM
नाशिक

VIDEO : इगतपुरी पूर्व भागात जोरदार गारपीट; बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राम शिंदे

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात बुधवारी (ता. २८) सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या जोरदार गारपिटीने धुमाकूळ घातला. दरम्यान, बेमोसमी पावसाने पूर्व भागातील पिंपळगाव मोरपासून खेड, अधरवड, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारशिगवे, सोनोशी, मायदरा, अडसरे बु, बेलगाव, धामणी, धामणगाव, टाकेद खुर्दसह साकूर फाटा, शेनीत, निनावी, भरविर परिसरात गारपिटीसह जोरदार हजेरी लावली. यामुळे संपूर्ण टाकेद परिसरात वीजपुरवठा बंद होता.



गारपिटीमुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरीवर्गात बागायतबरोबरच पावसाळ्यात मुक्या जनावरांसाठी गवत, वैरण, काडी साठविण्याचे कामकाज यासोबतच लाकूड फाटा, खत सामग्री करण्याचे कामकाज चालू आहे. अशातच संचारबंदीमुळे घरातच सुरक्षित बसलेला शेतकरी, शेतमजूर दोन वेळेच्या भ्रांतीसाठी घरीच मेहनत घेताना दिसत आहे. गहू, हरभरा काढणीनंतर पावसाळी मशागतीच्या पूर्वतयारीसाठी शेतकरी मेहनत घेताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये अवकाळीसारखे अस्मानी संकट हे शेतकऱ्यांच्या मुळावर आल्याने शेतकरीराजा दुहेरी संकटात पडला आहे. पूर्वपट्ट्यातील धरणालगत असलेल्या पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणगाव, भरवीर, निनावी, कवडदरा, साकूर अडसरे या परिसरातील कायम ओलिताखाली शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांसह जनावरांचा चारा, वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायत पिकांना अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT