Unseasonal Rain esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : मध्यरात्री पावसाची जोरदार हजेरी; कमाल तापमानात 4 अंशांची वाढ

Nashik News : मध्यरात्री एकच्‍या सुमारास शहर परिसरात बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे साडेसात मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्‍या काही दिवसांपासून वळिवाचा पाऊस सुरू असून, काही मिनिटांतच जोरदार पाऊस बरसतो आहे. सोमवारी (ता.१३) मध्यरात्री एकच्‍या सुमारास शहर परिसरात बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे साडेसात मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. दरम्‍यान मंगळवारी (ता.१४) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

कमाल तापमानात चार अंशांची वाढ झाली आहे. उन्‍हाळ्यापासून त्रस्‍त नागरिकांना वळिवाच्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत झेपावलेला पारा सध्या नियंत्रणात होता. परंतु ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत असताना, पारादेखील पुन्‍हा वाढला आहे.

सोमवारी (ता.१३) कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस असताना, मंगळवारी (ता.१४) तब्‍बल चार अशांची वाढ होऊन कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. विशेष म्‍हणजे किमान तापमानात घसरण झाली आहे. (latest marathi news)

नाशिकचे किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. मात्र मंगळवारी (ता.१४) नाशिकचे किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. दरम्‍यान, मध्यरात्री सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस बरसला.

साडेसात मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. मंगळवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण राहिले व वातावरणात वारे वाहत होते. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस बरसला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT