Heavy Rain News
Heavy Rain News esakal
नाशिक

Rain Update : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही धो-धो पाऊस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गणरायाचे बुधवारी (ता.३१) हर्षोल्हासात आगमन झाल्यानंतर त्याच रात्री विजांच्या कडकडाटात मुसळधारेला सुरवात झाली. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. गणेशोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही धो-धो पाऊस झालाय.

त्यामुळे धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे, तर गोदावरीच्या पातळीतही वाढ झाली आहे. होळकर पुलाखालून गुरुवारी (ता. १) रात्री आठला गोदावरीमधून नऊ हजार १३४ क्यूसेक्स पाणी वाहत होते. गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत १०१.५ मिलिमीटर पाऊस इगतपुरीमध्ये झाला. (Heavy rain on second day of Ganeshotsav 2022 nashik Rain Update Latest Marathi News)

नाशिकमध्ये बुधवारी रात्री साडेअकरा ते मध्यरात्री अडीचपर्यंत ५५.६ आणि अडीच ते पहाटे साडेपाचपर्यंत ११.६ असा एकूण ६७.२ मिलिमीटर पाऊस झाला. आज सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पावसाची नोंद झाली नाही. त्यानंतर रात्री साडेआठपर्यंत १७.६ मिलिमीटर पाऊस झाला. रात्री साडेआठनंतरही पावसाचा जोर कायम होता.

तालुकानिहाय गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः मालेगाव- ६२.५, बागलाण- ५६.५, कळवण- ४३.१, नांदगाव- ३०.४, सुरगाणा- ५५.८, नाशिक- ५५.२, दिंडोरी- ५०.९, पेठ- ३०.२, निफाड- ४९.७, सिन्नर- ८०.९, येवला- ३६.३, चांदवड- ४६.५, त्र्यंबकेश्‍वर- ६५.५, देवळा- ३८.५. दरम्यान, गुरुवारी रात्री आठला धरणातून सुरू असलेला विसर्ग क्यूसेक्समध्ये असा : दारणा- चार हजार ८८४, मुकणे- ७२६, कडवा- चार हजार २२०, वालदेवी- ४०७, गंगापूर- पाच हजार ८८४, आळंदी- २१०, भोजापूर- तीन हजार ७७०, नांदूरमध्यमेश्वर- १ हजार २८३, पालखेड- दोन हजार ५४४.

निम्मी धरणे ‘फुल’

जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम २४ प्रकल्पांपैकी निम्मी धरणे ‘फुल’ झाली आहेत. १५ धरणांमधून विसर्ग सुरू होता. धरणांमध्ये जलसंपदा विभागाने ९७ टक्के साठा ठेवला आहे. गेल्या वर्षी याच काळात ६६ टक्के साठा उपलब्ध होता.

इगतपुरी तालुक्यातील चार मंडल आणि सिन्नरमधील एक मंडलात २४ तासांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. इगतपुरीमध्ये ११०.३, नांदगावमध्ये १०६, टाकेदमध्ये १०४.८, धारगावमध्ये ११०.३, तर पांढुर्लीमध्ये ११८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मनपाकडून सावधानतेचा इशारा

नाशिक शहरात बुधवारी (ता. ३१) रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारीही पावसाची शक्यता लक्षात घेऊन नाशिक महापालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी दुपारी अग्निशामक दलाच्या गाडीने काठावरील नागरिकांसह व्यावसायिकांना आणखी पाणी वाढण्याच्या शक्यतेने सावधानतेचा इशारा दिला.

धार्मिक विधींना अडचणी

पहाटेपासून पाणीपातळी वाढल्याने दशक्रियांसह अन्य धार्मिक विधींसाठी जागा शिल्लक नव्हती. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोचले होते. त्यामुळे शहराच्या बाजूला मिळेल त्याठिकाणी दशक्रियाविधी पार पाडावे लागले. अस्थी विसर्जनही पुराच्या पाण्यातच करावे लागले. अहिल्याराम व्यायामशाळेजवळील चौथऱ्यावर पाणी नसल्याने पंचवटी भागातील दशक्रिया विधीसाठी फारशा अडचणी आल्या नाहीत.

वंजारवाडी येथील शेतकऱ्यांचे नुकसान

वंजारवाडी (ता. नाशिक) परिसरात मुसळधार पाऊस झाला. यात घरांसह टोमॅटो, काकडी आणि भात पिकांचे मोठे नुकसान झाले. याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतांचे बांधही फुटले असून, शिवारातील रस्ते उखडले आहेत.

या घटनेची दखल घेत गुरुवारी सकाळी खासदार गोडसे यांनी वंजारवाडी शिवारात धाव घेत शेतकऱ्यांचे नुकसानीची पाहणी केली. खासदार गोडसे यांनी तत्काळ सर्कल आणि तलाठी यांना बोलावून नुकसानभरपाई मिळण्यासाठी दोन-तीन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

खासदार गोडसे यांना सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी दूरध्वनी करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. या वेळी शिवाजी चुंभळे, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, तुकाराम शिंदे, अविनाश कातोरे, बाळासाहेब लोहकरे, अनिता बोथे, बाबूराव काळे, किसन शिंदे, समाधान कातोरे, रावसाहेब शिंदे, रमेश शिंदे, जयराम सामोरे आदी उपस्थित होते.

पूरपाण्याने वाहून गेलेल्या चौघांना वाचविण्यात यश

पंचवटी : रात्रभर चाललेल्या मुसळधारेने पहाटे अचानक गोदावरीला पूर आल्याने रामकुंड येथील गांधी ज्योतजवळ झोपलेले चार जण वाहून गेले होते. जीवरक्षक दल व अग्निशामक दलाच्या प्रयत्नांतून चौघांना बाहेर काढण्यात यश आले.

जीवरक्षक दल व अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे या चौघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. शहरात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण परिसरात सातत्याने विसर्ग होत आहे. यामुळे सतर्कतेच्या दृष्टीने मनपाच्या अग्निशामक व आपत्कालीन विभागाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली असून, त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT