Rain Update News esakal
नाशिक

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुन ते सप्टेंबर हा महिना मान्सून चा काळ म्हणुन ओळखला जातो.नाशिक जिल्यातील विविध भागात विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली .

आज 4 जुन रोजी नाशिकमध्ये दुपारी 12 वाजे पासुन पावसाने हजेरी लावलेली आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर ब्राह्मणगाव सह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस असे वातावरण दिसून येते. (Heavy rainfall in various parts of Nashik district Nashik News)

त्र्यंबकेश्वर मधील पावसाची स्थिती

त्र्यंबकेश्वर येथे दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान धुवाधार पाऊस पडला. अकरा वाजेच्या दरम्यान आकाशात ढग जमा होऊ लागले परंतु पाऊस दीड वाजता कोसळू लागला.

आकाश काळोखुन गेल्याने दिवसा अंधार झाला होता. त्यात विजा चमकत होत्या तर ढग गडगडाटी करत असल्याने पाऊस फार वेळ पडेल असे वाटत असतांना पुन्हा आकाश निरभ्र होऊन ऊन्ह पडल्याने सगळ्यांनाच हायसे वाटले.

शहरातील मुख्य रस्त्यात मात्र पावसाचे तळे तयार झाले होते. प्रतिवर्षी गंगा स्लॅब खालील व ओहळातील कचरा व घाण काढण्याचे काम पालिकेच्या वतीने करण्यात येते परंतु या वर्षी ते न केल्याने पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचले होते.

येथे रविवारची सुट्टी असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होती. अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची त्रेधा तिरीपिट उडाली. बोहोरपट्टी व मेन रोड येथील व्यावसायिक या पावसाने धास्तावले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बागलाण पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पर्यटन स्थळ असलेला साल्हेर किल्ला परिसरात ततानी, केळझर , पायरपाडा, महादर घाटंबा , साल्हेरवाडी या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटा सह मुसळधार पावसाने सुरुवात ची बॅटिंग जोरदार केल्याने शेतकरी सुखावला गेला आहे.

उमराणा येथे देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकाव होताना दिसून येतो. डुबेरे परिसरात जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक झाड कोलमडली आहे.

वणी येथे देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. सप्तशृंगी गडावर सकाळपासूनच वातावरणात बदल होत होता आज रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार वादळ सुरू झाले. त्यात रविवारचा बाजार असल्याने अनेक नागरिकांची, तसेच भाजीपाला विकायला आलेल्या शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली. झाले विविध ठिकाणी झालेल्या पावसामुळे नाशिककर तृप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

Latest Marathi News Update : बुलढाण्यात अतिवृष्टीचा तडाखा; शेतरस्ते वाहून, पंचनाम्याचे आदेश

SCROLL FOR NEXT