Malegaoan Rain Sakal
नाशिक

मालेगावाला मुसळधारेने झोडपले! पूर्व भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह तालुक्यात शुक्रवारी (ता.४) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह एक तास मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडाली. मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व भागातील झोपडपट्टी भागातील कच्च्या रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. (heavy rains along with strong winds lashed the malegaon taluka and city)

कॅम्प, संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागातही सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. सोयगाव, सटाणा नाका, नववसाहत, डीके कॉर्नर आदी भागातील बेसमेंटच्या दुकानांत पाणी साचल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. शहरात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वारा व पावसामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

शहर व परिसरात चार दिवसांपासून दुपारपर्यंत कडक ऊन पडत आहे. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाळी वातावरण निर्माण होते. शुक्रवारी दुपारी साडेतीनपासून जोरदार वादळी वारे वाहत होते. दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. तासभर झालेल्या मुसळधारेने जनजीवन विस्कळित झाले. शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. गटारी भरून वाहत होत्या. सोयगाव नववसाहत या भागात बेसमेंटला दर वर्षी पावसाळ्यात पाणी साचते. या भागात बहुतांश ठिकाणी गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. दर वर्षी मोठा पाऊस झाल्यास हा प्रश्‍न ऐरणीवर येतो. पावसाळा संपताच तो पुन्हा मागे पडतो.

ग्रामीण भागातही सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी आतापर्यंत दोन जोरदार पाऊस झाले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदीस सुरवात केली आहे. या वर्षीदेखील पेरण्या लवकर होण्याची शक्यता आहे.

(heavy rains along with strong winds lashed the malegaon taluka and city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT