Children enjoying the first rain esakal
नाशिक

नामपूरला पहिल्यांदाच दमदार पाऊस; उकाड्यापासून काहीसा दिलासा

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : नामपूरसह परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोसाट्याचा वारा (Storm) आणि विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या (Rains) सरी बरसण्यास सुरवात झाली. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. (Heavy rains for first time in Nampur Nashik News)

वादळी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे बळीराजा सुखावला असून, बच्चे कंपनीने पावसात भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला. नामपूरला दिवसभर उन्हाच्या असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी तीननंतर आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमू लागली. अचानक वातावरणात बदल झाल्याने सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. काही वेळातच विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाली. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तापमानात मोठी घट दिसून आल्याने समाधान व्यक्त केले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT