heavy monsoon Rain in wavi area esakal
नाशिक

वावी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्याच्या पूर्व भागात वावी परिसरात आज पावसाने जोरदार (Heavy Rains) हजेरी लावली. वावीसह काहंडळवाडी, दुसंगवाडी परिसरात दुपारी बारापासून सायंकाळी चारपर्यंत पावसाची सलग बॅटिंग सुरू होती. या जोरधारेमुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. वावी येथील आठवडे बाजारदेखील पावसामुळे सायंकाळी चारनंतर भरला. मान्सूनच्या जोरदार सलामीमुळे वावी परिसरातील बळीराजा (Farmer) सुखावला आहे. (Heavy rains in Wavi Nashik news)

गेल्या आठवड्यात देखील मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आजच्या पावसाने दिलासा मिळाला आहे. शेतात वापसा झाल्यानंतर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. परिसरात दुपारी बारापासून सुरू झालेला पाऊस थोडी विश्रांती घेत सलग चार तास कोसळत होता. यामुळे वावी येथील मंगळवारच्या आठवडे बाजारावर विरजण पडते की काय अशी परिस्थिती होती. मात्र, चार वाजेनंतर पावसाने उसंत घेतल्याने ऊन पडल्यावर बाजारात गर्दी झाली होती. आजच्या पावसाने परिसरात सर्वत्र शेतांमध्ये पाणी साचले होते.

समृद्धी महामार्ग परिसरात मात्र शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली. समृद्धी महामार्गावरून वाहणारे पाणी शेतांमध्ये घुसल्याने आणि पिके पाण्याखाली बुडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT