नाशिक

त्र्यंबकेश्‍वरमध्ये हॅलिकॉप्टर पोर्ट

CD
लोगो : सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्‍वरमध्ये हेलिकॉप्टर पोर्ट कायमस्वरूपी निर्मितीसाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या ३१ ऑक्टोबरला श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पूजन करण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरसाठी शहरात पोर्टची निर्मिती करण्यात येत आहे. या पोर्टवर एकाचवेळी तीन होलिकॉप्टरच्या लॅडिंगची सुविधा उपलब्ध असेल. हे पोर्ट तात्पुरते उभारण्यात येत आहे. पण, सिंहस्थ कुंभमेळा व त्र्यंबकेश्‍वरमध्ये वर्षभर होणारी गर्दी लक्षात घेत कायमस्वरूपी हेलिकॉप्टर पोर्ट निर्मितीसाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यास ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती प्रथमच नाशिकमध्ये येणार आहे. या वेळी त्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पूजन व कुशावर्त तीर्थावर ध्वजपूजन होणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रपतींना त्र्यंबकेश्‍वर येथे हेलिकॉप्टरने नेण्यात येईल. या वेळी दौऱ्यात राष्ट्रपतींच्या ताफ्यामध्ये तीन हेलिकॉप्टरचा समावेश असेल. त्यादृष्टीने त्र्यंबकेश्‍वर शहरात पोर्ट तयार केले जात आहे. मात्र, हे सिंहस्थ कुंभमेळा तसेच त्र्यंबकेश्‍वराच्या चरणी दर्शनासाठी वर्षभर असणारी भाविकांची रीघ लक्षात घेता त्र्यंबक शहरात कायमस्वरूपी हेलिकॉप्टर पोर्ट उभारणीसाठी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलिस विभागाकडून चाचपणी केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येेथून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. हेलिकॉप्टर कॉरिडॉर केदारनाथच्या धर्तीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये हेलिकॉप्टर कॉरिडॉर प्रस्तावित आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्‍वरमधील हेलिकॉप्टर पोर्टकडे पाहिले जात आहे. हा पोर्ट विकसित झाल्यास मुंबई-पुण्याहून हेलिकॉप्टरद्वारे अवघ्या तीस ते चाळीस मिनिटांत त्र्यंबकेश्‍वर गाठणे शक्य होईल. यानिमित्त भाविक आणि पर्यटकांची सुविधा लक्षात घेता शिर्डी, छत्रपती संभाजीनगरचे घृष्णेश्‍वर व अंजिठा-वेरूळ लेणी अशा कॉरिडॉरची निर्मिती शक्य आहे. भाविकांसाठी सुविधा नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, शिर्डी तसेच घृष्णेश्‍वर अशा हेलिकॉप्टर कॉरिडॉरमुळे मुंबई-पुण्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांना एकाच दिवसात प्रवास करणे शक्य होईल. या मार्गावर खासगी हेलिकॉप्टर कंपन्यांच्या सेवांमुळे स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन पर्यटकांना कमीत कमी दर तसेच वेळेत देवदर्शन घेता येणार आहे. ‘एमपीए’वर शिक्कामोर्तब राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्र पोलिस अकादमीत (एमपीए) हेलिपॅड उभारणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राष्ट्रपतींचा ताफा ओझर ते नाशिक तसेच नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर प्रवासात याच हेलिपॅडचा वापर करणार आहेत. ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. २२) या दौऱ्याच्या अनुषंगाने राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसाठी ‘एमपीए’ची चाचपणी या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे वृत्तावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! थकबाकीबाबतही उत्सुकता

Diwali Furniture Polishing Tips: दिवाळीच्याआधी लाकडी फर्निचर चमकवायचंय? घरातल्याच 'या' वस्तू येतील उपयोगी

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

SCROLL FOR NEXT