cidco baba esakal
नाशिक

स्मशानभूमीत उदरनिर्वाह करणाऱ्या बाबांना मदतीचा ओघ सुरू

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि.नाशिक) : जिवंतपणीच तीन मुलांनी जन्मदात्या बापाला उंटवाडी स्मशानभूमीत सोडून दिल्याचे सचित्र वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर समाजातील विविध घटकांमधून भावनात्मक व काहीशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ८१ वर्षीय बाबांना हवी ती मदत करण्याची तयारी सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी दर्शविली. मंगळवारी ‘सकाळ’च्या बातमीदाराकडे यासंदर्भात विचारणा झाली. यावरून माणुसकी अजूनही शिल्लक आहे, याचा प्रत्यय आला. एका प्रकारे ही सकारात्मक बाबच म्हणावी लागेल. (help-continue-to-Baba-lives-in-cemetery-nashik-marathi-news)

या बाबांवर ही परिस्थिती आणणाऱ्या मुलांनी आपणही कुणाचे तरी बाबा आहोत, याचा विचार करायला हवा. आपण जसे वागलो तशीच आपली मुले आपल्याशी वागल्यास काय वाटेल, हे त्यांनी लक्षात घ्यावे. ‘करावे तसे भरावे’ ही म्हण त्यांनी लक्षात ठेवावी. बाबांची ही परिस्थिती खूप दुःखदायक आहे. त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. -अमित कुलकर्णी, अध्यक्ष, निसर्गसेवक युवा मंच महाराष्ट्र

बाबांची करुण कहाणी ‘सकाळ’मध्ये वाचली. स्मशानभूमीत जाऊन बाबांची भेट घेतली. प्रथम त्यांची ॲन्टिजेन टेस्ट केली. त्यांची दाढी व कटिंग करून त्यांना नवीन कपडे परिधान केले. त्यांना भोजनही दिले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्या आरोग्याची तपासणी करून सलाइन लावली. बाबांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहत असलेला आनंद बघून मनाला समाधान वाटले. यापुढेही बाबांना असेच सहकार्य करणार आहे. -सुमीत शर्मा, सहसचिव, आप

बाबांच्या व्यथेला वाचा फोडून दैनिक ‘सकाळ’ने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात व्यवस्था करून देण्याचे ठरविले आहे. लवकरच बाबा पूर्वीसारखेच आनंदी जीवन जगतील, अशी परिस्थिती निर्माण करू, असे मी सर्वांना आश्वस्त करू इच्छिते. -सायली पालखेडकर, अध्यक्षा, सेवतीर्थ सेवाभावी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : तळोज्यात १ कोटींच्या अमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई; दोघे जेरबंद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT